Share

लसीकरण उत्सव! डोस उपलब्ध होताच जालन्यात पुन्हा लसीकरणास सुरुवात

Published On: 

जालना: भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोवीड लस संपल्याने मागील दोन दिवसापासुन लसीकरण मोहीमेस अडथळा निर्माण झाला होता. त्यानुसार येथील आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनाकडे २ हजार कोविड डोसची मागणी केली होती. परंतु त्यांना केवळ दोनशेच डोस मिळाले. गुरुवारी लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली असली तरी लवकरच लसीकरणाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्रामीण भागातील नागरिक लस टोचून घेण्यासाठी उत्साही आहे. वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने पाहत मागणी प्रमाणे डोसचा पुरवठा करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे दवाखान्यात लसीचा तुटवडा निर्माण होत असल्याने लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांचा रोष येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. पिंपळगाव रेणुकाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रार्गंत जवळजवळ १९ गावाचा समावेश आहे.

त्यामुळे येथील आरोग्य केंद्रात उपचार घेणाऱ्यांची संख्या जवळजवळ ४१ हजार ४१४ च्या घरात आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोनाने मोठ्या प्रमाणात पाय पसरविण्यास सुरूवात केली आहे. यात अनेकांना कोरोनाची लागन होऊन त्यांचा मृत्यू देखील झाला असल्याच्या घटना घडल्या आहेत. शासन व प्रशासन गंभीर असून कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जमेल त्या पध्दतीने प्रयत्न करुन नागरिकांना सजग करण्यासाठी गावागावात जनजागृती केली जात आहे. यामध्ये पिंपळगाव रेणुकाई येथील आरोग्य केंद्र आघाडीवर आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!