Share

‘एकच प्याला’साठी तोबा गर्दी; शेवटी बोलवावे लागले पोलीस

Published On: 

बीड: शहरात कोरोना रुग्णांनी रुग्णालये रोज भरत आहेत त्यात ऑक्सिजनचा तुटवडा तसेच इतर वैद्यकीय सुविधांचा तुटवडा, अशा गंभीर परिस्थितीत बीड शहर असतानाच दुसरीकडे मात्र जगाशी काही घेणं देणं नसणारी एकंच प्याला साठी भटकणारी मद्य प्रेमी मात्र दारूच्या दुकानांवर तोबा गर्दी करत असल्याचे गुरुवारी बघ्याला मिळाले. या गर्दीत कुठलेही नियम पाळले जात नव्हतेच तसेच कोरोनाची भीती सुद्धा यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती.

शहरातील चार शासकीय व पाच खासगी कोविड सेंटर रुग्णांमुळे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. नव्याने बाधित रुग्णांसाठी जागा मिळत नसल्याने रोज कोविड सेंटर वाढवण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे, अशा संकटकाळातही शहरातील वाइन शॉपीसमोर गुरुवारी सकाळपासून मद्यपींची रांग लागलेली होती. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला. त्यातही गोंगाटा सुरू होता. अखेर वाइन शॉपी चालकावर थेट पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली. या सर्व प्रकारामुळे नागरिकांचा निष्काळजीपणा दिसून आला, अशाने कोविड संकट अधिक वाढत आहे याचेही त्यांना भान नाही.

नागरिकांच्या सहकार्याने कोविडच्या पहिल्या लाटेचा सामना माजलगाव तालुक्याने चांगल्या पद्धतीने केला. मात्र, गेल्या काही दिवसांत वाढती गर्दी, मास्क न वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, अशा कारणांमुळे दुसऱ्या लाटेत कोविड बाधितांची संख्या तालुक्यात झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या संख्येमुळे रुग्णसेवेचे व्यवस्थापन करताना प्रशासन व आरोग्य विभागाच्या नाकीनऊ येत आहे. सद्यःस्थितीत तालुक्यात साडेचारशेवर रुग्ण आहेत, अशी ही स्थिती असतानाही प्रशासन नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडून जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन करत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!