बीड: जिल्हायचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून राबावण्यात येत असलेल्या मिशन झीरो डेथ अभियानाने केज शहरासह केज तालुक्यातही चांगलाच वेग पकडला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातलाच एक भाग म्हणजे मिशन झीरो डेथ. या अभियानांतर्गत नियमांचे पालन करण्यासह दुखणे अंगावर न काढता तत्काळ कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जिल्ह्यात वाढती रुग्ण संख्या पाहून कोविड केअर सेंटर, हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर बेड वाढवण्यात येत आहेत. तसेच नवीन कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात येत आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील नागरिकांना टेस्ट करून घेण्याबरोबरच लसीकरणाला प्रोत्साहित करण्यात येत आहे. परंतु बहुतांश लोक टेस्ट तसेच लसीकरणास प्रतिसाद देत नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी १९ एप्रिलपासून संपूर्ण जिल्ह्यात मिशन झीरो डेथ अभियान सुरू केले. मिशन झीरो डेथ अभियानांतर्गत केज तालुक्यात गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली १२०० शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
नेमणूक करण्यात आलेल्या प्रत्येकी दोन शिक्षकांना १०० घरांची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये शिक्षक व अंगणवाडी सेविका प्रत्येक गावातील प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची चौकशी करून ऑक्सिजन लेव्हल, ताप इत्यादी चेक करून काही लक्षणे दिसून आली तर संबंधित व्यक्तीस कोरोना टेस्ट करून घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. तसेच त्यांची अद्ययावत नोंद ठेवून प्रत्येक कुटुंबावर आरोग्याच्या दृष्टीने लक्ष ठेवून आहेत. या अभियानामुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक माहिती संकलित होत असल्याने जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होण्यास अभियानाचा मोठा फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनुदानित दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग होणार लागू
- शतकवीर ‘पडीक्कल’वरुन रंगले खासदार आणि माजी क्रिकेटपटूत ट्विटरवॉर
- “महाराष्ट्रासाठी ‘एअरलिफ्ट’द्वारे ऑक्सिजन पुरवठा होणार, केंद्राचा सकारात्मक प्रतिसाद”
- बीडमध्ये आमदार विरुद्ध जिल्हाधीकारी; रेमेडेसिवीर मिळत नसेल तर आम्हाला फाशी देऊन मारा – आ. सुरेश धस
- ‘…त्यामुळेच तो भारतीय संघात स्थान मिळवू शकत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

