Share

परमबीर सिंगावर होणाऱ्या आरोपांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपप्रिय ईडीकडून देशमुखांवर कारवाई

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्रीपदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आता वाढ झाली असून ईडीने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आता पैशाची अफरातफर केल्याचा आरोप करत ईडीकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशमुख यांच्या चौकशीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आला. आता या प्रकरणात ED ने सुद्धा एन्ट्री केली आहे. ईडीडून अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लॉन्डरिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच अनिल देशमुख यांची ईडी मार्फत देखील चौकशी होण्याची शक्यता आहे.

ईडीकडून करण्यात आलेल्या या कारवाईवरून आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी आता भाजपवर टीकास्त्र डागायला सुरु केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते व विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करून भाजपसह ईडीवर देखील गंभीर टीका केली आहे. ‘ माजी गृहमंत्री श्री अनिलजी देशमुख यांच्यावर सुड भावना उगवण्यासाठी व परमविर सिंगावर दिवसेंदिवस वाढलेलेल्या आरोपावरून लक्ष हटवण्यासाठी भाजपाप्रिय ईडी आता सक्रिय झाली आहे. सुड भावनेतून हा FIR केल्या गेलाय. अशा दुर्बुद्ध वागण्याने देशमुख साहेबांवर तिळमात्र फरक पडणार नाही.’ अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना प्रतिमहिना १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत चांदिवाल समिती चौकशी करणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!