मुंबई – देशात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून महाराष्ट्राप्रमाणेच देशात इतर राज्यात देखील या विषाणूचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये देखील कोरोनामुळे हाहाकार मजला असल्याचे चित्र आहे. याच मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होत आहेत. यातच आता राष्ट्रवादीने देखील भाजपवर या मुद्द्यावरून टीका केली आहे.
उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये भाजपाने रामराज्याची भाषा केली होती परंतु दोन्ही राज्यांना भाजपाने रामभरोसे सोडले असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.उत्तरप्रदेशमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ जाहिराती करून सत्यापासून लांब पळत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये नदीमध्ये प्रेते टाकलेली आढळली आहेत. यमुना नदीत आणि हमिदपूरच्या नदीत तर गंगा नदीत ४० च्यावर प्रेते दिसली आहेत. याठिकाणी परिस्थिती चांगली नाही हे यावरून स्पष्ट दिसत आहे. बिहारमध्ये टेस्टींग होत नाहीय. डॉक्टर नाहीत. लोकं दिवसा डोळे उघडतात आणि संध्याकाळी मृत्यू होतोय. प्रेते जाळण्यासाठी लाकडे नाहीत म्हणूनच नातेवाईक प्रेते नदीत टाकत आहेत ही सत्य परिस्थिती आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांच्या अडचणी आणखी वाढल्या,आता ईडीनेही दाखल केला गुन्हा
- ‘सोलापूरचे पाणी पळवणारे भरणे हे चोर आहेत आणि अजित पवार हे दरोडेखोर आहेत’
- एप्रिल महिन्याच्या आयसीसी पुरस्कारात पाकिस्तानच्या बाबर आझमने मारली बाजी
- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मोठी मागणी
- ‘आंदोलन दडपण्यासाठीच भरणे यांनी इंदापूरचे शेतकरी व शिवसैनिकांना बोलावले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

