Share

‘तो’ नराधम आणि पीडित महिला एकमेकाला ओळखत होते; महापौर पेडणेकर यांचा धक्कादायक दावा

Published On: 

मुंबई : मुंबईतील साकीनाका येथील मन विषन्न करणाऱ्या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने आता या महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेमुळे सर्वच क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, पीडितेचा मृत्यू होण्यापूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राजावाडी रुग्णालयात जात तिच्या प्रकृतीची माहिती घेतली होती. यावेळी या पीडितेच्या एकमेव नातेवाईक, तिच्या आईची देखील पेडणेकर यांनी भेट घेतली. यांनतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून संताप व्यक्त केला होता. यावेळी त्यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे.

‘या महिलेला अमानूषपणे मारहाण करण्यात आली आहे. ही महिला 10 ते 12 वर्षापासून त्या पुरुषाला ओळखत होती. एकाने फोन करून सांगितले होते, त्याच्यासोबत पीडितेच्या सातत्याने भांडण होत होतं; असं या महिलेच्या आईने सांगितल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. पुढे त्यांनी, ‘पुरुषांमध्ये इतकी क्रूरता कुठून येते?’ असा सवाल करत संताप व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!