मुंबई : हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री गॅल गडोट म्हणजेच वंडरवुमन हिने एक इच्छा व्यक्त केली आहे. इंस्टाग्रामवर शाहीन बागच्या ‘बिलकीस दादी’ला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गॅल गडोटने न्यूईयरच्या निमित्ताने वर्षभरात चर्चेत आलेल्या काही महिलांचे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये तिने शाहीन बागचा देखील फोटो आहे. व वंडरवुमनला यांना बेहटायची इच्छा आहे. गॅल गडोटची हि पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.
या महिला तिच्या दृष्टीने 2020 मधील वंडर वुमन्स असल्याचं गॅल गडोटने सांगितलं आहे. अशातच तिने आपल्या या खास यादीमध्ये शाहीन बागमधील ‘बिलकीस दादी’ यांचाही समावेश केला आहे. या पोस्टमध्ये गॅल गडोटने इतरही अनेक महिलांचे फोटो शेअर केले आहेत. त्याचसोबत कॅप्शनमध्ये #MyPersonalWonderWomen हा हॅशटॅगही वापरला आहे.
https://www.instagram.com/p/CJcOvQ3B5ii/?utm_source=ig_web_copy_link
आपल्या आयुष्यातील वंडर वुमन्सचे फोटो शेअर करत गॅल गडोटने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "2020 ला मागे सारताना माझ्या आयुष्यातील वंडर वुमन्सना माझ्याकडून खूप खूप प्रेम. यांमधील काही माझ्या आयुष्यातील अत्यंत जवळच्या महिला आहेत, काही माझ्या कुटुंबातील, तर काही मैत्रिणी आहेत. तसेच यामध्ये काही प्रेरणादायी महिला आहेत, ज्यांच्याबाबत ऐकून मला खरंच खूप आनंद झाला. तसेच यामध्ये काही अशा महिलाही आहेत, भविष्यात ज्यांची भेट घेण्याची माझी इच्छा आहे. आम्ही एकत्र येऊन चांगलं काम करु शकतो. तुम्हीही तुमच्या आयुष्यातील वंडर वुमन्स माझ्यासोबत शेअर करा.’
महत्वाच्या बातम्या
- नववर्षाच्या सुरुवातीलाच जग कोरोनामुक्त होवो; सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद लवकरच मिळो – अजित पवार
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाच्या कामाला वेग; समितीची स्थापना
- औरंगाबादमध्ये आता काँग्रेसचा महापौर बसवा; शिवसेनेच्या सत्तेला थोरातांचं थेट आव्हान
- औरंगाबादचा महापौर काँग्रेसचा करण्यासाठी कामाला लागा; थोरातांचे कार्यकर्त्यांना निर्देश
- शिवसेनेला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने राज ठाकरेंच्या उपस्थित मनसेत केला प्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी!


