Share

धनंजय मुंडेंचा धडाकेबाज निर्णय अन् ‘त्या’ दोन्ही सावित्रीच्या लेकी आता शिकणार थेट परदेशात !

Published On: 

मुंबई : परदेश शिष्यवृत्तीसंदर्भात दोन विद्यार्थिनींना भेडसावत असलेली समस्या जाणून घेतल्यानंतर विशेष बाब म्हणून या दोन विद्यार्थिनींना परदेश शिष्यवृत्ती मिळण्यासंदर्भात विशेष आदेश निर्गमित करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. या निर्णयामुळे या दोन विद्यार्थिनींना परदेश शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

कु. तेजस्वी लक्ष्मण शिंदे ही सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील अंगापूर येथील प्रतिभावंत विद्यार्थिनी ‘स्पेस सायन्स’ अर्थात अंतराळ विज्ञान शाखेत ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठात पीएचडीचे शिक्षण घेत असून, जगभरातील निवडक १५० विद्यार्थ्यांपैकी हा बहुमान मिळालेली ती एक विद्यार्थिनी आहे. ऑस्ट्रेलियन विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे तिला देय असलेली शिष्यवृत्तीची रक्कम परदेश शिष्यवृत्तीच्या मिळणाऱ्या रकमेतून वजा करण्याचा मूळ नियम आहे. परंतु कु. तेजस्वीने आर्थिक परिस्थिती पाहता परदेश शिष्यवृत्तीची पूर्ण रक्कम मिळावी, जेणेकरून तिच्या परदेशातील शिक्षण व उदरनिर्वाहास अडचण येणार नाही, अशी विनंती सामाजिक न्याय विभागाकडे केली होती, ही बाब धनंजय मुंडे यांना समजताच परदेश शिष्यवृत्ती योजनेतील देय असलेला पूर्ण लाभ या विद्यार्थिनीस देण्यात यावा असा आदेशच मुंडे यांनी निर्गमित केल्याने तेजस्वीच्या आनंदाला पारावार उरला नाही.

मुलींचे शिक्षण व सक्षमीकरण करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या धनंजय मुंडे यांचे मी मनःपूर्वक आभार मानते. तुमच्यामुळेच माझ्या स्पेस सायन्स पीएचडीची वाट मोकळी होऊ शकली, अशा शब्दात तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात नागपूर येथील कु. स्नेहा काशीनाथ घोडेस्वार या विद्यार्थिनीला ऑस्ट्रेलियामधील सिडनी विद्यापीठात मास्टर ऑफ इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला होता व ती परदेश शिष्यवृत्तीस पात्र ठरली होती, मात्र सदर विद्यापीठाने ऐनवेळी तिच्या जागी दुसऱ्या विद्यार्थ्यास प्रवेश दिल्याने स्नेहासमोर समस्या उभी राहिली.

शिष्यवृत्ती योजनेच्या नियमांचा विचार करत, ऑस्ट्रेलियामधील ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय विद्यापीठात मास्टर ऑफ इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवत तिने शिष्यवृत्ती लागू व्हावी याबाबत विनंती केली होती. त्यानुसार श्री. धनंजय मुंडे यांनी विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याचा विचार करत तातडीने विशेष बाब म्हणून निर्णय घेत बदललेल्या विद्यापीठातील बदललेल्या कोर्ससाठी परदेश शिष्यवृत्ती लागू करण्याचा निर्णय घेतल्याने स्नेहाच्या चेहऱ्यावर हसू उमलले.

कु. स्नेहा घोडेस्वार हिने आपल्या मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रवेशासह परदेश शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिल्याबद्दल मुंडे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीत, अशा भावना व्यक्त केल्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!