मुंबई : बॉलिवूडमधील अभनेत्री दीपिका पादुकोणच्या सोशल मीडियावरील सगळ्या पोस्ट डिलीट झाल्या आहेत. हे पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर आता एकही पोस्ट दिसत नाही.
दीपिका पदुकोण बॉलिवूड मधील प्रसिद्ध आणि टॉपची अभिनेत्री आहे. इन्स्टाग्रामवर वरती दीपिकाला भारतातच नाही तर जगभरात फॉलो केले जाते. दीपिकाचे फक्त भारतातच चाहते नसून जगभरात दीपिकाचे चाहते आहेत. दीपिकाचे इन्स्टाग्रामवरती तब्बल 52 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. फेसबुक आणि ट्विटवरही तिला अनेक लोक फॉलो करतात. मग अचानक दीपिकाने सगळ्या पोस्ट डिलीट का केल्या असा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित होत आहे.
दीपिका पादुकोणचे सोशल मीडिया अकाऊंट हँक झाले का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. तर काहींना हा नव्या चित्रपटाच्या प्रमोशनचा फंडा वाटत आहे. काही चाहत्यांचं म्हणणं आहे की, नवीन वर्षात तिला सोशल मीडियापासून लांब राहायचं असेल म्हणून तिने हे पाऊल उचललं असेल. दीपिकाने तिच्या सोशल अकाउंटवरील पोस्ट का डिलीट केल्या असतील याची अद्यापही माहिती समोर आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
- नववर्षाच्या सुरुवातीलाच जग कोरोनामुक्त होवो; सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद लवकरच मिळो – अजित पवार
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाच्या कामाला वेग; समितीची स्थापना
- औरंगाबादमध्ये आता काँग्रेसचा महापौर बसवा; शिवसेनेच्या सत्तेला थोरातांचं थेट आव्हान
- औरंगाबादचा महापौर काँग्रेसचा करण्यासाठी कामाला लागा; थोरातांचे कार्यकर्त्यांना निर्देश
- शिवसेनेला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने राज ठाकरेंच्या उपस्थित मनसेत केला प्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी!


