🕒 1 min read
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात असताना या ताफ्यातील पोलीस पायलेटिंग मोटार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाच्या खाली आज सकाळी उलटली. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र दोन जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने शरद पवार निघाले होते. तेव्हा, पाठीमागील पोलीस व्हॅन (MH- 12 NU- 5881) ही अचानक उलटली. यामुळे यातील वाहनचालक आणि एक अधिकारी जखमी झाले. अपघात झाल्याने शरद पवार यांनी त्यांची गाडी थांबवून अपघातात जखमी झालेल्यांची विचारपूस केली आणि त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. अपघातात पोलीस व्हॅनचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आजचा दिवस हा अपघाती दिवस बनला आहे. सकाळी खोपोली शहरच्या हद्दीत ढेकू गावाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात झाला होता. या अपघातात दोन जण ठार तर चार जण जखमी झाले होते. याठिकाणी झालेली अपघातांची कोंडी कमी होते न होते तोच खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमृतांजन पुलाच्या खाली पोलीस व्हॅन पलटी झाली.
#corona : ठाण्यात पुन्हा एकदा लॉकडाउन
रोगाशी लढायचंय, रोग्याशी नाही, कॉलर ट्यूनवर आंबेडकरांचा तीव्र आक्षेप
त्यांना मूर्खाच्या नंदनवनात रहायचे असेल तर राहू द्या – पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
