सोलापूर : कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. कोरोनाबाधित 16 हजार 922 ने वाढले तर मृतांचा आकडा 418 ने वाढला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाख 73 हजार 105, त्यापैकी एकूण 2 लाख 71 हजार 697 रुग्ण बरे झाले आहेत. जनजागृतीसाठी सरकारने विविध उपाय केले. मात्र आता यातीलच एका उपायावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली तीव्र आक्षेप घेतला आहे.
पवार साहेब हे मौल्यवान रत्न; पडळकर, राजकारण बदनाम करू नका; मनसेच्या महिला नेत्याची टीका
‘मागील तीन महिन्यांपासून प्रत्येकाच्या मोबाइलवर कोविडची कॉलर ट्यून येतेय. या माध्यमातून लोकांना विनाकारण भीती दाखवली जातेय. यामागे नेमकं काय षडयंत्र आहे याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा,’ अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.
कोरोनापेक्षा जास्त लोक टीबीने दगावले होते, टीबीच्या वेळेस लॉकडाऊन झालं नव्हतं. कोरोनामुळे लॉकडाऊन झालं त्यामुळे अनेक जण उपाशी आहेत, रोजगार बंद आहेत. सर्वसामान्यात कोरोनाची रिंगटोन लावून भीती निर्माण केली जात आहे, 3 महिने झाले तरी रिंगटोन बदलली नाही, यामागे काय षडयंत्र आहे हे मोदींनी सांगितल्याशिवाय कळणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
‘सोशल डिस्टेंसिंगचं पालन न केल्यास पुन्हा लॉकडाऊन करु’
‘लोकांचं आयुष्य सरकारनं उद्ध्वस्त केलंय. लॉकडाऊनमुळे अनेक लोक मानसिक रोगी झाले आहेत. आरोग्य यंत्रणेमुळं अनेकांचा जीव वाचत आहेत, लॉकडाऊनमुळे नाही,’ असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला. ‘यापुढं कुठल्याही तारखेची वाट न बघता सर्वांनी नेहमीसारखं जीवन जगायला सुरुवात करावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

