Share

त्यांना मूर्खाच्या नंदनवनात रहायचे असेल तर राहू द्या – पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यातील आघाडी सरकारमध्ये असणाऱ्या तिन्ही पक्षांमध्ये ताळमेळ नसल्याची टीका विरोधी पक्षाकडून केली जाते. हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. शरद पवार यांच्या हातामध्ये सरकारचा रिमोट आहे, असा प्रचारही विरोधकांकडून केला जातो. या सर्व टीकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीच उत्तर दिले आहे.

शरद पवारांशी पंगा घेणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या अडचणीत आणखी वाढ

पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या प्रश्नांना उत्तर देताना पवार म्हणाले की, मी सरकारच्या दैनंदिन कामामध्ये लक्ष घालत नाही, तिन्ही पक्ष सरकारचा घटक म्हणून काम करत आहोत. सर्व कारभार हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियंत्रणाखाली आहे. मी केवळ निसर्ग चक्रीवादळ कोरोनासारखे संकट यांच्या आपत्ती व्यवस्थापनात जरूर लक्ष घालतो.

चित्रपटसृष्टीतील विविध कामांना शासनाची मान्यता, मनोरंजन, चित्रपट क्षेत्राला मोठा दिलासा

ठाकरे सरकार मतभेदांमुळे फार काळ चालणार टिकणार नाही. प्रशासनातील अधिकारी सगळे निर्णय घेत आहेत, असा आरोप भाजपकडून केला जातो हे विचारल असता पवार म्हणाले, त्यांना मूर्खांच्या नंदनवनात राहायचे असेल तर राहू द्या. मात्र ठाकरे सरकार भक्कम आहे. ठाकरे सरकार पाच वर्षांचा कालावधी नक्की पूर्ण करेल. त्यानंतरच्या निवडणुकाही तीनही पक्ष एकत्रित लढवतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मोठी बातमी : कोरोना उपचारासाठीची औषधे जुन अखेरीस जिल्ह्यात उपलब्ध होणार-आरोग्यमंत्री राजेश टोपे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!