🕒 1 min read
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाउन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ जुलैपासून सुरू होत असलेल्या या लॉकडाउनला ‘लॉकडाउन एकचे’ सगळे नियम पुन्हा लागू केले जाणार आहेत. ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिका आयुक्तांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण ठाण्यात पुन्हा टाळेबंदी लागू केली जाण्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरु होती. प्रशासनाकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. पण अखेर आज पोलीस आणि महापालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर लॉकडाउनचा अधिकृत आदेश देण्यात आला आहे.
ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. “ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ठाणे, कल्याण-डोंबवली, भिवंडी, उल्हासनगर या चार महानगरपालिका आणि अंबरनाथ, बदलापूर या नगरपालिकांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी घऱात राहणं अपेक्षित आहे. गरजेच्या गोष्टी, कामांसाठी खासगी कार, टॅक्सी, रिक्षा ज्यामध्ये एक अधिक अशा दोघांना आणि दुचाकीवर एकालाच परवानगी आहे. असं असतानाही लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे. यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. कंटेनमेंट झोन, रेड झोन वाढत आहेत,” असं अमित काळे यांनी सांगितलं आहे.
“या अनुषंगाने ठाणे पोलिसांनी सर्व ठिकाणी कडक नाकाबंदी लावली आहे. विनाकारण फिरणारे, गरज नसताना बाहेर पडणारे यांच्यावर कारवाई सुरु केली आहे. गाड्या जप्त देखील केल्या आहेत. कालच्या दिवसात दोन हजार वाहनांवर कारवाई केली. पहाटे पाच वाजेपर्यंत अडीचशे वाहनांवर कारवाई झाली आहे. सर्व नागरिकांनी घरातच थांबावं, अनावश्यक असताना बाहेर पडू नये अथवा कडक कारवाईला सामोरं जावं लागेल,” असा इशारा अमित काळे यांनी यावेळी दिला आहे.
शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक; आमदारांच्या मागण्यांवर चर्चा
#corona_effect : पुण्यातील मानाच्या गणेशोत्सव मंडळांचा मोठा निर्णय : यंदा गणेशोत्सव साधेपणाने !
मुंबईत कोरोनाचा हाहाकार; शिवसेनाभवन पुढील काही दिवस बंद राहणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
