मुंबई : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल्स चॅलेंजर बेंगळुरुने राजस्थान रॉयल संघाचा १० गडी राखुन पराभव केला. या विजयासह आरसीबीची विजयी घौडदौड कायम आहे. आरसीबी संघाचा स्पर्धेतील हा सलग चौथा विजय आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार कोहलीचा निर्णय सार्थ ठरवत सीराजने तिसऱ्याच षटकांत सलामीवीर जोस बटलर(८) आणि डेव्हिड मिलर(०) दोघांना बाद करत राजस्थानला चांगली सुरुवात करुन दिली. राजस्थानच्या ४३ धावा झाल्यावर कर्णधार सॅमसन(२१) बाद झाल्यावर शिवम दुबे (४६), रियान पराग(२५) आणि राहुल तवेतिया(४०) यांनी संघाचा डाव सावरला. निर्धारित २० षटकात राजस्थानचा संघ १७७ धावांपर्यत मजल मारली. आरसीबीकडून सिराज आणि हर्षद पटेल दोघांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
राजस्थानच्या १७८ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या आरसीबी संघाने राजस्थानच्या संघाला संघर्ष करण्याची संधीच दिली नाही. आरसीबीच्या दोन्ही सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पड्डिक्कल यांनी सुरुवातीपासुनच आक्रमक फंलदाजी करत राजस्थानच्या आव्हानातील हवा काढुन घेतली. दोघांनी नाबाद १८१ धावांची भागिदारी करत सतराव्या षटकातच राजस्थान रॉयल्स संघाचा १० गडी राखुन दणदणीत विजय मिळवला.
संजू सॅमसन हा आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद सांभाळत आहे. पहिल्याच सामन्यात त्याने पंजाबविरुद्ध 119 धावा ठोकल्या होत्या. मात्र त्यानंतर संजूच्या बॅट तळपलीच नाही. पुढच्या तिन्ही सामन्यात संजू 4,1 आणि 21 धावा करुन माघारी परतला. रॉयल चॅलेंजर बेंगळुरुविरुद्धच्या सामन्यानंतर टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर संजू सॅमसनवर चांगलेच भडकले आहेत. अशा निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघात अद्याप स्थान मिळवू शकला नाही, असं सुनील गावसकर म्हणाले.
सुनील गावसकर म्हणाले, “पहिली गोष्ट म्हणजे कर्णधाराला सुरुवातीपासून संघाचा मोर्चा सांभाळावा लागतो. संजू पहिल्या सामन्यात जबरदस्त खेळला. मात्र त्यानंतर सातत्याच नाही. हीच त्याची समस्या आहे. त्यामुळेच तो भारतीय संघात स्थान मिळवू शकत नाही”
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारसाहेब तुम्ही काही करू नका, नाहीतर तुमचे साखर कारखाने हवेतील ऑक्सिजन पण सोडणार नाहीत’
- ‘शरद पवारांना आपत्कालीन परिस्थितीत काम करण्याचा उत्तम अनुभव त्यांचा एक फोन चित्र पालटू शकतो’
- राज्याच्या ऑक्सिजन संकटात आता शरद पवार मैदानात; साखर कारखान्यांना लिहिलं पत्र
- सेवानिवृत्त धारकांचे महिन्याच्या पाच तारखेच्या पेन्शन करा- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले
- भाजपचे किती लोकप्रतिनिधी मला भेटतात हे एकदा तपासा, अजितदादांचा चंद्रकांतदादांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

