बीड: गुरुवारी रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी व पुरवठ्यावरून जिल्हाधिकारी रवींद्र जगताप व आमदार सुरेश धस यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे बघायला मिळाले. एकसुद्धा रेमडेसिविर इंजेक्शन दिले गेले नाही तर आम्ही माणसं जाळायची तरी किती? रेमडेसिविर मिळत नसेल तर जगायचे कशाला आम्हाला फाशी देवून मारा, अशा संतप्त भावना आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या. या वेळी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त रामेश्वर डोईफोडे यांच्या कडे असलेली इंजेक्शन नियंत्रणाची जबाबदारी काढून उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांच्याकडे दिली.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिविर मिळत नसल्याने रुग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे इंजेक्शनचा काळाबाजार रोखून तातडीने गरजूंना इंजेक्शन उपलब्ध करावे, या मागणीसाठी आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार तसेच इतर पक्षाचेही स्थानिक प्रमुख गुरुवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. जिल्हाधिकारी जगताप यांच्यासमोर आक्रमक होत सर्वांनी रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याची तक्रार केली. या वेळी आमदार धस जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, एक तरी इंजेक्शन जिल्ह्यात वाटले का असा सवाल उपस्थित करत शिरूर रुग्णालयाला किती इंजेक्शन दिले ते दाखवा नाहीतर मी राजीनामा देतो. डोईफोडे नावाचा माणूस हा रेड मारतो आणि इंजेक्शन गोळा करतो तो कुणाला इंजेक्शन देतो याची चौकशी करा. जिल्हाधिकारी साहेब, आम्ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहतो का? की आष्टी व शिरूर तालुका पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे? काय दाखवता तुम्ही अर्ज ?आमच्यावर सरसकट गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाका, असा संताप धस यांनी व्यक्त केला.
रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे भरारी पथक नेमले होते. यात सहाय्यक आयुक्त औषधे रामेश्वर डोईफाडे हे पथक प्रमुख होते. परंतु, तक्रारी पाहता जिल्हाधिकारी जगताप यांनी गुरुवारी दखल घेत रामेश्वर डोईफोडेंकडील रेमडेसिविर इंजेक्शनच्या नियंत्रणाची जबाबदारी काढून उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांच्याकडे दिली.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! मृत कोरोना रुग्णाच्या खिशातून पैसे लंपास, आरोपी ताब्यात
- पोलीस बंदोबस्तात बीड जिल्ह्याला मिळाले ऑक्सिजन
- निलेश लंकेंनी शब्द पाळला; बिनविरोध ग्रामपंचायतींना २५ लाखांचा निधी दिला !
- 1 मे आधी तुला लस मिळालीच कशी? ; अनिल कपूर यांनी लस घेतल्यानंतर पोरासह नेटकऱ्यांनीही घेतली फिरकी
- रुग्णांना जीवदान देणारी रुग्णालये निष्कळजीपणामुळे मृत्यूचे सापळे ठरू नयेत – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

