अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- शिर्डी नगराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला असून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई निर्माण ग्रुप आणि नगरसेवकांसमोर जगन्नाथ गोंदकर यांना सव्वा वर्षानंतर नगराध्यक्षपदाचा दिलेला शब्द पाळणार की अन्य कोणत्या नगरसेवकांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ टाकणार याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागून आहे. दरम्यान आम्हाला नगराध्यक्षपदाचा विखे पाटील पिता-पुत्रांनी दिलेला शब्द निश्चित पाळतील अन्यथा आम्हाला आमचा मार्ग मोकळा असल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये सुरू झाली असून आता विखे पाटील काय भूमिका घेतात याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिर्डी नगरपंचायतीत विखे प्रणित भाजपाचे पूर्ण बहुमत असून गत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत साई निर्माण ग्रुपचे जगन्नाथ गोंदकर यांनी आ.विखे पाटील यांना नगराध्यक्ष पदावर आपली वर्णी लागावी यासाठी मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. मात्र आ.विखे यांनी अर्चनाताई कोते यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करताना साईनिर्माण ग्रुपला सव्वा वर्षानंतर अनुक्रमे जगन्नाथ गोंदकर व अशोक गोंदकर यांना सव्वा-सव्वा वर्षासाठी नगराध्यक्ष करण्याचा शब्द दिल्याने विजय कोते यांनी आपल्या नगरसेवकांची समजूत काढल्याने त्यावेळचे बंड काही प्रमाणात शमले होते.
अर्चना कोते यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीला दोन वर्षाचा कालखंड झाला तरी यावर कुणी काही बोलायला तयार नाही. त्यामुळे आता अर्चना कोते यांचा राजीनामा घेऊन विखे पाटील यांनी गत निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करून जगन्नाथ गोंदकर यांना नगराध्यक्ष करावे यासाठी आता नगरसेवकांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. आमदार विखे यातून काय मार्ग काढतात? याकडेच आता शिर्डीकरांचे लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पुणे स्मार्ट सिटी’ची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा, अजित पवारांचे आदेश
- आठवलेंचा एक आमदार-खासदार तरी आहे का? त्यामुळे त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही !
- धक्कादायक : जिल्हाधिकारी उद्धटासारखे वागले म्हणून ८९ डॉक्टरांनी दिलेत राजीनामे
- भाजपच्या आमदारांचे ‘क्राइम फ्री सिटी’चे स्वप्न पूर्ण होणार का ? असा असेल नागपूरच्या विकासाचा आराखडा
- …तर मुंबईतील लोकल सेवा सुरु करणे शक्य ; मंत्री आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

