🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला.
प्रकाशन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम सोशल डिस्टसिंगचा नियम पाळुन प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात झाला. मात्र, या कार्यक्रमाला आमंत्रण देऊनही काँग्रेसचा कोणीही मोठा नेता आला नाही. त्यावरून माजी मंत्री आ.विखे पाटील यांनी खंत व्यक्त करतानाच काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
आ.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे मी सर्वांना निमंत्रण दिले होते. परंतु तरी देखील कार्यक्रमाला काँग्रेसचा एकही नेता व्यासपीठावर आला नाही. त्यामुळे मनामध्ये खंत आहे.
कारण काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपण निमंत्रण दिले होते. व्यक्तीश: जाऊन मी भेटलो होतो. परंतु हा जो काही सिमीत दृष्टीकोन काँग्रेस पक्षाची मंडळी सातत्याने ठेवत आली आहे, त्यातूनच महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये पडझड सुरू आहे. बाळासाहेब विखे यांच्या कार्याचा गौरव स्वतः पंतप्रधान यांनी केल्याने मला वाटत नाही की काँग्रेसचे नेते उपस्थित राहिले किंवा न राहिल्याने काही परिणाम झाला, असे आ.विखे म्हणाले.
तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना मी स्वतः कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. वास्तविक त्यांनी जिल्ह्याचा कार्यक्रम म्हणून उपस्थित राहायला हवे होते. महाविकास आघाडीचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः कार्यक्रमाला उपस्थित होते. कारण या कार्यक्रमात राजकारणाचा कुठेही संबंध नव्हता, असेही ते म्हणाले.
दरम्यान, बाळासाहेब विखे पाटील यांच्यासारखा काँग्रेसमध्ये कोंडला गेलेला हिरा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेत घेऊन कोंदणात बसवला, असे वक्तव्य प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याबाबत विखे यांना विचारले असता ते म्हणाले, अनेक वर्ष पक्षात राहिल्यानंतर पक्षाकडून सातत्याने होणारा जो अन्याय आहे, त्याचे शल्य बाळासाहेब विखे यांना होते. काँग्रेसची आज जी दुरवस्था झाली आहे, ती तेथे कर्तृत्ववान माणसाला संधी नाही, म्हणून झाली आहे, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :-
- संत, महंत, वारकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नका, चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा
- ‘साधूसंतांना अटक करून उद्धव ठाकरे सरकारने राज्यात मोगलाई अवतरल्याचे दाखवून दिले’
- ‘चंद्रकांतदादा परत बाप काढू नका, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार देखील नाही’
- ‘कर्नाटक’मध्ये कंगना विरोधात गुन्हा दाखल
- …तर मी भाजपात प्रवेश करीन, कन्हैय्या कुमार यांचं मोठं विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
