Share

जाणून घ्या नाश्त्याला सर्रासपणे बनविल्या जाणाऱ्या पोह्यांच्या उपयुक्ततेबद्दल

Published On: 

पुणे- जगावर सध्या कोरोनाचे सावट आहे. यातच आता पावसाळा देखील सुरु झाला आहे.या काळात तब्ब्येतीकडे दुर्लक्ष करणे चांगलंच महागात पडू शकते म्हणूनच आम्हीआमच्या वाचकांसाठी काही आरोग्य वर्धन करणाऱ्या काही टिप्स देत आहोत.

विविध औषधीवनस्पती,पदार्थ याबद्दल आम्ही नेहमीच आपल्यासमोर उपयुक्त अशी माहिती आणत असतो.आज आपण नाश्त्याला सर्रासपणे बनविल्या जाणाऱ्या पोह्यांच्या उपयुक्ततेविषयी जाणून घेणार आहोत.

भारतात अनेकठिकाणी सकाळी नाश्त्याला पोहे खाल्ले जाते. हा नाश्ता पोटभरीचा मानला जातो. जे लोकडाएटिंग करत आहेत त्यांच्यासाठी पोहे खाणे फायदेशीर असते.पोहे नाश्त्यात खाल्ल्यास शरीरातील रक्ताचीकमतरता दूर होते. शरीराला एनर्जी मिळते. तसेच मधुमेहाचा त्रास कमी होण्यास मदतहोते. नाश्त्यामध्ये पोहे खाल्ल्यास तुमचे आरोग्य चांगले राहते आणि पोटही भरलेले राहते.

सकाळी नाश्त्याला पोहे खाल्ल्याने तुमचेपोट भरलेले राहते. आणि काम करायला एनर्जी मिळते. वाटीभर पोह्यातून शरीराला मोठ्यापामानावर कार्बोहायड्रेट्स मिळतात. त्यामुळे पोहे हा नाश्त्याचा उत्तम पर्याय आहे.कार्बोहायड्रेसमुळे शरीरात उर्जा निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे वेळी-अवेळीलागणार्या भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी चिप्स किंवा बिस्कीटं खाण्याऐवजी पोहेफारच आरोग्यदायी आहेत.

पोहे प्रामुख्याने रक्तप्रवाहातून ग्लुकोजरिलीज करतात त्यामुळे बराच वेळ भुक लागत नाही. तसेच पोहे पचण्यास हलके असून थोडेसुद्धा खाल्ल्यास पोट भरल्यासारखे वाटते. फायबर भरपूर प्रमाणात असल्याने वजन कमीआणि नियंत्रणात राहण्यास मदत होते.

महत्वाच्या बातम्या- 

गेल्या २४ तासांत देशभरातील कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक

‘ती’ नावे लवकरच जाहीर करतो, निलेश राणेंचा खळबळजनक दावा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!