मुंबई : गेले ५ महिने राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव बघता रुग्णांच्या सोयीसाठी राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने विलगीकरण व उपचार करता यावे यासाठी कोट्यावधींचा निधी खर्च करत युद्धपातळीवर जम्बो रुग्णालय व कोविड सेंटर्सची निर्मिती केली.
मात्र, आता संतापजनक बाब समोर येत आहे. पदाचा गैरवापर करत आपल्याच मुलाला कोविड सेंटरचे काम दिल्याचा आरोप मनसेने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर लावला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महापौरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “आपल्याच मुलाला कोव्हिड सेंटर्सचे काम देत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पदाचा गैरवापर केला आहे. त्यांनी सगळ्यात आधी राजीनामा दिला पाहिजे” , अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.‘पुत्र-मोहातून शिवसेना बाहेर निघेल का?’ असा सवाल देशपांडे यांनी ट्विटरवर विचारला.
कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांच्या मुलालाच, मनसेचा आरोप
यासंदर्भात भाजपा नेते निलेश राणे यांनी खळबळजनक दावा केला आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत, काही घोटाळ्यात सामील असलेल्या बृहन्मुंबई महापालिकेच्या नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
फडणवीस आणि त्यांच्या टोळीने राज्याचा कारभार कसा करावा हे शिकवू नये : रुपाली चाकणकर
निलेश राणे यांनी, ” चारी बाजूंनी पोखरतायत.. मिळेल तिथे फावडे मारतायत. काही प्रॉपर्टी एजंट ना विचारा ह्या मार्केट मध्ये कोण प्रॉपर्टी घेत आहे तर सांगतात त्यात BMC नेते/अधिकाऱ्यांचे नावं आहेत. ती नावं लवकरच जाहीर करतो. मुंबईतील कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांच्या मुलाला ” असे ट्विट करत आता सर्वांचे लक्ष वेधले आहे. नेमकी ती नावे कोणती? कोण बडे अधिकारी व नेते यात सामील आहेत? किती मोठा घोटाळा आहे? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
चारी बाजूंनी पोखरतायत.. मिळेल तिथे फावडे मारतायत. काही प्रॉपर्टी एजंट ना विचारा ह्या मार्केट मध्ये कोण प्रॉपर्टी घेत आहे तर सांगतात त्यात BMC नेते/अधिकाऱ्यांचे नावं आहेत. ती नावं लवकरच जाहीर करतो.
मुंबईतील कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांच्या मुलाला https://t.co/KKRH2FjlnC
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 20, 2020
दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि संतोष धुरी यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर आरोप केले. महापौरांनी मात्र आरोप फेटाळून लावत मनसेविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. “कोव्हिडच्या काळात महापालिकेत मोठे घोटाळे झाले. घोटाळे करण्यात शिवसेना सगळ्यात पुढे आहे. कोव्हिड सेंटर्सच्या नावाखाली शेकडो कोटींचे घोटाळे झाले. किश कंपनी नेमकी कोणाची आहे?” असा सवाल मनसेने उपस्थित केला.
अजब सरकार गजब निर्णय, शौमिका महाडिकांचा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

