Share

धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयानं हर्ट झालीय ‘ही’ अभिनेत्री 

Published On: 

नवी दिल्ली-  एक वर्षापासून क्रिकेटपासून दूर असलेल्या भारताचा दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप आहे. सैनिकी स्टाईलमध्ये इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन त्याने याची घोषणा केली.

39 वर्षीय एम.एस धोनीने कसोटी क्रिकेट मधून यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली आहे. एकदिवसीय आणि टी -२० सामन्यात तो भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्वाचा भाग होता. पण आता धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनी क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधारही होता. तसेच धोनीच्या नावाच्या बऱ्याच मोठ्या विक्रमांच्या नोंदी आहेत.

धोनीच्या निवृत्तीनंतर बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीनं एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.या पोस्टमध्ये ती म्हणाली,  ‘चॅम्पियन बनण्याचा विश्वास तू आमच्यात निर्माण केलास. तुझ्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकलेल्या सर्व विजयाचा अभिमान आहे. तू आम्हाला विजयाची सवय लावलीस.. प्रत्येक क्रिकेट चाहत्याचं स्वप्न तू सत्यात उतरवलंस आणि तुझ्या निवृत्तीनं आम्हाला वास्तविकतेची जाण करून दिली.”

”तुझ्या या निर्णयानं हर्ट झालीय, परंतु आम्ही तुझ्यासोबत आहोत. तू आमच्यासाठी प्रेरणादायी आहेस, युवा क्रिकेटपटूंमध्ये तू निर्माण केलेला विश्वास, असाच वाढत राहणार आहे. तू मिळवलेल्या यशाबद्दल तुझे अभिनंदन आणि पुढच्या इनिंगसाठी शुभेच्छा,”असेही तिनं लिहिलं.

महत्वाच्या बातम्या- 

आनंदाची बातमी : ‘या’ जिल्ह्यातील शनिवार, रविवारची संचारबंदी कायमस्वरुपी बंद

सुशांतच्या केसमध्ये मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!