औरंगाबाद : राज्यात सद्या मराठा आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा बांधव आक्रमक झाले असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. अशातच मराठा आरक्षणप्रश्नी प्रश्न विचारला असता ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तरुणाला शिवीगाळ केल्याचा क्लिप सद्या प्रसारमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
खुद्द या युवकाने एक व्हिडीओ बनवून सदर घटना सर्वांसमोर आणली असून आपले काही बरे वाईट झाल्यास त्याला सत्तारच जबाबदार असतील असं देखील सांगितलं आहे. मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोड तालुक्यातील टाकळी जीवरग गावच्या दौऱ्यावर होते. यावेळी भगवान जीवरग या तरुणाने मराठा आरक्षणाच काय झालं? व शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्तारांना प्रश्न केला असता त्यांची जीभ घसरली व त्यांनी त्याला अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
‘तुझ्या घरात घुसून मरेन, तुझं खानदान बरबाद करेन’ अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचा आरोप या तरुणाने केल्याने सद्या तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मंत्रिपद असलेल्या लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारची धमकी देणे व शिवीगाळ करणे हे दुर्दैवी असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. तर या युवकाने पोलिसांनी योग्य कारवाई करावी अन्यथा जे काही होईल त्याला मंत्री सत्तारचं जबाबदार असतील असे देखील सूचित केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस जाणार का?
- फेसबुक आणि ट्वीटरने फेक अकाऊंटचे मालक कोण? हे जाहीर करावे – राष्ट्रवादी
- पुणे : दोन लाख विद्यार्थी ऑनलाईन तर 50 हजार विद्यार्थी ऑफलाईन अंतिम वर्षाची परीक्षा देणार
- ‘अच्छे दिन’चं गाजर दाखवून सत्तेत आलेले आज हुकूमशाही पध्दतीने वागत आहेत
- अनंत करमुसे प्रकरणात पोलिसांवर कारवाई झाली, आव्हाडांना अटक कधी होणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

