🕒 1 min read
मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेली कारवाई राजकीय कट असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. टॉप्स सिक्युरिटीला कंत्राट आधीच्या सरकारच्या काळात देण्यात आले, याचे उत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
विरोध पक्षांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय संस्थांचा वापर होत आहे. २०१४ पासून केंद्रातील सरकारने ईडी, सीबीआय, आयकर या संस्थांचा विरोधी पक्षांच्या विरोधात गैरवापर केलेला आहे. विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्यासाठी या संस्थांचा वापर केला जात आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सराकारमधील घटक पक्ष शिवसेनेच्या आमदारांवरील ईडीची कारवाई त्याच पद्धतीची आहे, असा थेट आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.
सदर कंत्राट २०१४-१५ ला टॉप सिक्युरिटी ला मिळाले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री कोण होते? देवेंद्र फडणवीस जी
MMRDA चे अध्यक्ष कोण होते? देवेंद्र फडणवीस जी! मग सदर कंत्राट कसे दिले गेले? याचे उत्तर कोणी दिले पाहिजे? देवेंद्र फडणवीस यांनी-
पाच वर्ष भाजपा गप्प का बसली ? https://t.co/JPhkJJrBwo— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 27, 2020
सादर कंत्राट २०१४-१५ ला टॉप सिक्युरिटी ला मिळाले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री कोण होते? देवेंद्र फडणवीस MMRDA चे अध्यक्ष कोण होते? मग हे कंत्राट कसे दिले गेले? याचे उत्तर कोणी दिले पाहिजे? देवेंद्र फडणवीस यांनी ना. ते पाच वर्ष गप्प का बसले ? , ९ कंपन्यांना काम देण्यात आले, ६ पैकी १ टॉप्स सिक्युरिटी आहे.
१५ कोटींचे काम विभागून दिले जातं. किरीट सोमय्या खोटं बोलत आहेत. MMRDA ने कंत्राट दिलं, हे कंत्राट आधीच्या सरकारच्या काळात देण्यात आलं, याचं उत्तर फडणवीस यांनी दिलं पाहिजे. जर लाच घेतली गेली असं वाटतं असेल तर पाच वर्षांत चौकशी का केली नाही, असा थेट सवाल सचिव सावंत यांनी केला. कंत्राट द्यायचे फडणवीस यांनी दिले आहे ना, सरनाईक नगरविकास मंत्री होते की मुख्यमंत्री होते? मुख्यमंत्र्यांपेक्षा सरनाईक पॉवरफुल्ल होते का?, याचे उत्तर फडणवीस यांनी दिले पाहिजे, असे सावंत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलियाच्या धावांचा डोंगर; पांड्याची लढवय्यी झुंज
- पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यासह हैदराबाद आणि अहमदाबाद दौऱ्यावर
- राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं निधन
- ‘जी भांडी मोकळी असतात ती फार वाजतात, भरलेलं भांडं कधी वाजत नाही’, सुप्रिया सुळेंचा भाजप नेत्यांना टोला
- वुहानचा व्हायरस त्याला भारी पडणार ‘पुनावाला सायरस’, पवारांच्या वर्गमित्राची सिरम !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

