🕒 1 min read
मुंबई : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यापूर्वी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे हे दादरच्या शिवाजी पार्कवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वांद्रे येथील बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या दोन्ही दसरा सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत येत आहेत. कोणताही अनुचित प्रकार किंवा हाणामारी होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इतिहासात पहिल्यांदाच एकाच पक्षाचे दोन दसरा मेळावे होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ एकमेकांवर धडाडणार आहे. दरम्यान शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिपाली सय्यद म्हणाल्या, “दोन मेळावे होत आहे. कुणाकडे गर्दी जास्त होईल यापेक्षा दोन्हीकडे शिवसैनिक आहेत हे महत्वाचे आहे. त्यामुळे मला आनंद आहे की माझा प्रत्येक शिवसैनिक आज सेभेला येत आहे. दोन मेळावे होत आहेत त्यामुळे मनात चुनचुन आहे. कुठेतरी गोष्ट स्थिर व्हायला हवी, मी वाट बघत आहे की दोन गट एकत्र व्हायला पाहीजेत. बाळासाहेब ठाकरे यांचा हात ज्याच्यावर आहे. ज्यांच्या विचाराला घेऊन लोक पुढे जात आहेत. राजकारणात काहीही होऊ शकते.”
जो तुमचं काम करतो तो तुमचा नेता-
“शरद पवार यांनी देखील असाच बंड उभारला होता. राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. पण जो तुमचं काम करतो तो तुमचा नेता. आज दोन्ही ठीकाणी खूप गर्दी होणार आहे. शिवसेना आज जगात नंबर १ वर आहे. आज दोन गट आहेत पण हळू हळू सर्व ठीक होईल”, असे देखील दिपाली सय्यद म्हणाल्या.
दोन्ही मेळाव्याकडे देशाचे लक्ष-
उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला संबोधित करतील, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर संबोधित करतील. या दोन्ही मेळाव्याकडे देशाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा ५ दशकांपासून सुरू आहे. मात्र या वर्षी दोन मेळावे होत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Dasara Melava | “अगोदर पेपर फोडणार नाही पण…”; शिंदे गटाचे दसरा मेळाव्याबाबत मोठं विधान
- Ajit Pawar । आधी कुणाची सभा ऐकणार?, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे?, अजित पवारांनी उघडपणे सांगितलं…
- Pankaja Munde | ज्या पक्षात कुणीच जात नव्हतं त्या पक्षात गोपीनाथ मुंडे गेले – पंकजा मुंडे
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी शिवसैनिकांची उत्सुक्ता, दुपार पासूनच शिवसैनिक जमा होण्यास सुरुवात
- Pankaja Munde | पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात भाषणानंतर कार्यकर्त्यांमध्ये राडा ; पोलिसांचा लाठीचार्ज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
