औरंगाबाद: कॉंग्रेसच्या बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रेच्या अनुषंगाने भाजप प्रवेशाच्या हालचाली पुन्हा सुरु केल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुक कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरुनच लढवायचा निश्चय सत्तारांनी केला आहे. मात्र स्थानिक तसेच जिल्हा कार्यकारिणीतुन होणारा विरोधातून आतापर्यंत सत्तारांचा भाजपात प्रवेश होऊ शकला नाही. असे असले तरी प्रवेशासाठीचे प्रयत्न सत्तारांनी सोडलेले नाही. सत्तार आठवड्यातून एक ते दोन वेळा भोकरदनला जाऊन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेत आहे. सत्तारांचा सुरु असलेल्या अट्टाहास दानवे पुरवणार का याकडेच सर्वाचे लक्ष लागून आहे.
लोकसभा निवडणुका झाल्यापासून सत्तारने भाजप मध्ये प्रवेशासाठी प्रयत्न सुरु केले होते. औरंगाबादेतून एका विशेष विमानाने दानवे आणि सत्तार मुंबईत गेले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्याची भेट घेतली होती. मंत्रीमंडळ विस्ताराच्या वेळीही भाजपात प्रवेश करून मंत्रीपद मिळणार असल्याचे सत्तार सर्वत्र सांगत होते. मात्र सत्तारा होणारा विरोध पहाता प्रवेशही झाला नाही. आणि मंत्रीपदही मिळाले नाही. स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकी पुर्वी शिवसेनेतही मुलगा समीर साठी प्रयत्न केले तेही असफल झाले. सिल्लोड व औरंगाबादेतून मोठा प्रवेश होऊ नयेत यासाठी दबाव येत असतानाही सत्तारांनी प्रयत्न सोडेलेले नाही. प्रवेश व्हावा यासाठी सत्तार आठवड्यातून एक ते दोन वेळा भोकरदन गाठत दानवेची भेट घेत आहे.
मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्राची सिल्लोडलाही सभा होणार असल्यामुळे सिल्लाडे शहर आणि तालुक्यात सत्तारांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्याचे स्वागताचे बॅनर लावले आहेत. यात सत्तारांचाही फोटो लावण्यात आला आहे. यामुळे या महाजनादेश यात्रेत सत्तारांचा प्रवेश निश्चत मानला जात आहेत.
महत्वाच्या बातम्या
-
राष्ट्रवादीला कोकणात धक्का, माजी प्रदेशाध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करणार
-
उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर
-
सुप्रसिद्ध डान्सर सपना चौधरीचा भाजपमध्ये प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
