Share

‘त्या तरुणाचा बोलवता धनी कोण?’ अब्दुल सत्तारांनी फेटाळले ‘ते’ आरोप

Published On: 

औरंगाबाद : राज्यात सद्या मराठा आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा बांधव आक्रमक झाले असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. अशातच मराठा आरक्षणप्रश्नी प्रश्न विचारला असता ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तरुणाला शिवीगाळ केल्याचा क्लिप सद्या प्रसारमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

खुद्द या युवकाने एक व्हिडीओ बनवून सदर घटना सर्वांसमोर आणली असून आपले काही बरे वाईट झाल्यास त्याला सत्तारच जबाबदार असतील असं देखील सांगितलं आहे. मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोड तालुक्यातील टाकळी जीवरग गावच्या दौऱ्यावर होते. यावेळी भगवान जीवरग या तरुणाने मराठा आरक्षणाच काय झालं? व शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्तारांना प्रश्न केला असता त्यांची जीभ घसरली व त्यांनी त्याला अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

यावर अब्दुल सत्तार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘आठ-साडेआठच्या दरम्यान तो युववक भाषण सुरु असताना मध्ये मध्ये येऊन विचलित करू लागला. पोलिसांनी त्याला २-३ वेळा बाहेर काढले, तहसीलदार देखील हजर होते. त्यानंतर मी जे काही बोललो यावर ती क्लिप कुठं कुठं व्हायरल केली, त्याचा बोलवता धनी कोण आहे यावरून शंका आहे. मी सर्व पाहिलं असून खोटं आहे, यात कोणतंही तथ्य नाही’ असं म्हणत त्यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.

युवकाने केला गंभीर आरोप

‘तुझ्या घरात घुसून मारेन, तुझं खानदान बरबाद करेन’ अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचा आरोप या तरुणाने केल्याने सद्या तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मंत्रिपद असलेल्या लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारची धमकी देणे व शिवीगाळ करणे हे दुर्दैवी असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. तर या युवकाने पोलिसांनी योग्य कारवाई करावी अन्यथा जे काही होईल त्याला मंत्री सत्तारचं जबाबदार असतील असे देखील सूचित केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!