अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार सांगतात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचे कॅप्टन आहेत. कॅप्टन बाहेर फिरत नाहीत आणि त्यांना बाहेर फिरू देखील देत नाही. शरद पवार स्वत: या वयातही राज्य पिंजून काढत असून राष्ट्रवादी वाढविण्याचे काम करत आहेत.
यामागे शिवसेना संपविण्याचा राष्ट्रवादीचा डाव असल्याची टीका माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केली होती. परंतु माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी शिवसेनेची नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी. आमदारकी गेल्यापासून कर्डिले यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. शिवाजी कर्डिले दुसरे नारायण राणे झालेत, असा पलटवार नगर तालुका शिवसेना व राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री कर्डिले यांच्यावर केला आहे.
शिवसेनेचे नगर तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, गोविंद मोकाटे व राष्ट्रवादीचे केशव बेरड यांनी कर्डिले यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी यांनी मिळूनच कर्डिले यांचा राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात पराभव केला. विधानसभेला पराभूत झाल्यामुळे कर्डिलेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे.
कर्डिले यांना कोणी विचारत नसून त्यांचे राजकारण संपुष्टात आले आहे. कर्डिले यांनी स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी शिवसेनेची नाही. आजवर शिवसेना साथ देत होती, म्हणूनच तुम्ही आमदार होत होतात. यावेळी साथ दिली नाही तर तुम्ही पराभूत झालात असे शिवसेना व राष्ट्रवादीने कर्डिलेंना सुनावले आहे.
तसेच कर्डिले अजून पराभवाच्या धक्क्यातून सावरले नसल्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारची वक्तव्ये येत आहेत. आपली पेपरला बातमी यावी यासाठी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर बोलत आहे.
नगर तालुक्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने कर्डिले यांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये धूळ चारली आहे. आता आमदारकी गेल्याने कोणी कर्डिलेंकडे जात नाही. ते स्वतःहून कार्यकर्त्यांना बोलावून घेतात, असेही या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- ‘अजून बाळंतीण झाली नाही आणि हे नाव ठेवून मोकळे’; दरेकरांचा देशमुखांना टोला
- सर्व सफाई कर्मचा-यांची कोव्हिड तपासणी करा; महापौरांनी दिले निर्देश
- पुणे : दोन लाख विद्यार्थी ऑनलाईन तर 50 हजार विद्यार्थी ऑफलाईन अंतिम वर्षाची परीक्षा देणार
- ‘अच्छे दिन’चं गाजर दाखवून सत्तेत आलेले आज हुकूमशाही पध्दतीने वागत आहेत
- अनंत करमुसे प्रकरणात पोलिसांवर कारवाई झाली, आव्हाडांना अटक कधी होणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

