Share

राधाकृष्ण विखे पाटील अनुभवी नेते, त्यांनी शिवसेनेत यावे; अब्दुल सत्तार यांच्या ऑफरने राजकीय चर्चांना उधाण!

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राधाकृष्ण विखे पाटील अनुभवी नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाची महाराष्ट्र राज्याला गरज आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत यावे. अशी ऑफर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिली आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अब्दुल सत्तार आणि राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूरमध्ये एकाच मंचावर आले होते. त्यावेळी सत्तार यांनी हे वक्तव्य केले आहे.

राज्यात शिवसेना व भाजपमध्ये जोरदार संघर्ष सुरु असताना तसेच पदवीधर निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला असताना सत्तार यांनी विखेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. कार्यक्रमानंतर राधाकृष्ण विखेंच्या लोणी येथील निवासस्थानी जाऊन सत्तार यांनी विखेंबरोबर स्नेहभोजन केले. भोजनानंतर विखे-सत्तारांमध्ये गप्पांची मैफल रंगली. दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

राधाकृष्ण विखे यांनी मात्र अब्दुल सत्तार आणि आपल्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, अब्दुल सत्तार आणि माझी पक्ष विरहीत मैत्री आहे. अनेक वर्षापासुन ते माझे चांगले स्नेही आहेत. आमच्या या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, असे विखे म्हणाले.

विखे-सत्तार दोघेही वर्षभरापूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्यात खास मैत्री होती. मात्र दरम्यानच्या काळात काही गणिते बदलली आणि सत्तारांनी सेनेत प्रवेश केला तर विखेंनी भाजपमध्ये. दोघांच्या राजकीय वाटा जरी वेगळ्या झाल्या असल्या तरी आज सत्तारांनी विखेंची भेट घेऊन मैत्री शाबूत ठेवली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!