Share

अबब! चौदा वर्षापासून फरार खुनी अखेर गजाआड

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : ढूँडनेसे तोह खुदा भी मिल जाता है, आदमी क्या चीज हैl थेरबन येथील खून प्रकरणात १४ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस भोकर पोलिसांनी दि.२ एप्रिल रोजी मोठ्या शिताफीने गजाआड केले आहे. तालुक्यातील थेरबन येथे दि.१२ एप्रिल २००७ रोजी सायंकाळी आरोपी नारायण संभा दांडेकर, संभा अर्जून दांडेकर, बाळू ऊर्फ परमेश्वर दांडेकर व विश्वांभर अर्जून दांडेकर या चौघांनी संगनमत करुन घराजवळील रिकाम्या जागेच्या वादातून रामा सायन्ना आंबलवाड यांना चाकू, काठ्याने मारहाण करुन जिवे मारले व बालाजी व लक्ष्मण यांना गंभीर जखमी केले होते.

तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या परसराम जळबा कोलंकू यांनाही जखमी केले होते. या प्रकरणी आरोपींविरूध्द भोकर पोलिसात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणातील तिघांना पोलिसांनी अटक करुन दि. ३० जून २००७ रोजी आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यातील आरोपी विश्वांभर अर्जून दांडेकर हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. पोलीस आरोपीच्या शोधात होते. परंतु आरोपी नेहमी पोलिसांना हुलकावणी देत होता.

२ एप्रिल रोजी फरार आरोपी सोमठाणा येथे येत असल्याची माहिती पोलिसांना कळाल्यावर पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे,पोहेकॉ केंद्रे, मुधोळे, जेंकुट, सरोदे यांच्या पथकाने शुक्रवारी, २ एप्रिल रोजी मोठया शिताफीने विश्वांभर दांडेकर याला गजाआड करून न्यायालयात हजर केले असता आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!