Share

‘सोनू सूद के सन्मान में आम आदमी पार्टी मैदान में’

Published On: 

नागपूर : कोरोनाची वैश्विक महामारी सुरु होताच लॉकडाऊनच्या कारणास्तव स्थलांतरित कामगारांना मदत करून चर्चेत आलेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गेल्या आठवड्यापासून इतर कारणांमुळे चर्चेत आहे. याचे कारण आयकर विभागाने गेल्या तीन दिवसांपासून सोनू सूदच्या मुंबई येथील निवासस्थानी तपास केला.

आयकर विभागाच्या मते, सोनूच्या स्वयंसेवी संस्थेने 2.1 कोटी रुपये परदेशातून क्राऊड फंडींगच्या माध्यमातून जमवले आहेत. हे परदेशी योगदान (विनिमय) कायद्याचा उल्लंघन आहे. सोनू सूद आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांवर टॅक्स चोरी करण्यात आल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत,सोनू सूदने आपलं अघोषित उत्पन्न बनावट स्त्रोतांमार्फत घेण्यात आलेल्या कर्जाच्या स्वरुपात दाखवलं होतं, असं आयकर विभागाने म्हटले आहे.

याच पार्श्वभूमीवर सोनू सूद याच्या समर्थानात आम आदमी पार्टीने नागपुरात आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. सोनू सूद याच्या घरी आणि कार्यालयावर आयकर विभागाने धाडी टाकत कारवाई सुरू केली आहे. त्याविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्ते कार्यकर्ते म्हणाले की, सोनू सूद याने कोरोना काळात चांगलं काम केलं, युवकांसाठी तो काम करत असतो. असं असूनही सोनू सूद हा आम आदमी पक्षाचा मेंटर झाल्यामुळे सूडबुद्धीने त्याच्याविरोधात ही कारवाई केली जात आहे. ही कारवाई बंद केली नाही तर मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आप कार्यकर्त्यांनी दिला आहे.

तर आता या छापेमारीबाबत आता सोनू सूदने मौन सोडले आहे. यावेळी बोलताना त्याने काही धक्कादायक खुलासे देखील केले असल्याचे पाहायला मिळाले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला कि, ‘मला एका पक्षाकडून दोन वेळा राज्यसभेची ऑफर देण्यात आली आहे. परंतु मी अद्याप या गोष्टीसाठी तयार नाही. जेव्हा मी स्वत:ला तयार करेन तेव्हा स्वत: सगळ्यांसमोर ही गोष्ट जाहीर करेन.’ असं म्हणत सोनूने त्याला कोणत्या पक्षातून ऑफर मिळाली होती हे सांगणं मात्र टाळले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!