मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला रविवारी रात्री मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केलं. त्यावरून सोमवार सकाळपासून बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्व० सुशांत सिंह राजपूत के पिता श्री के०के० सिंह द्वारा पटना में स्व० सुशांत सिंह राजपूत की मौत से संबंधित दर्ज कराए गए मामले की सी०बी०आई० से जांच कराने हेतु राज्य सरकार ने अनुशंसा भेज दी है।
— Nitish Kumar (@NitishKumar) August 4, 2020
दरम्यान, आता या तपास सीबीआयला सोपवण्याची शिफारस बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे. मंगळवारी सुशांतच्या कुटुंबाच्या मागणीवर नितीश कुमारांनी हा निर्णय घेतला. बिहारमधील सत्तारुढ पक्ष जेडीयूचे प्रवक्ता संयज सिंह यांनी याबाबतची माहिती दिली. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी बिहार सरकारने सीबीआय चौकशीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान,सुशांतसिंहच्या प्रकरणावरून सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष भाजपसह काही मंडळी करत आहेत. तर, मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यास सक्षम आहेत, असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सोमवारी मुंबईत आलेल्या बिहारी पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाइन केल्यामुळं आरोप-प्रत्यारोपाला जोर चढला आहे. महाराष्ट्र सरकार नेमकं काय लपवतंय, असा सवाल भाजपनं केला होता.
People are doing mud slinging on me personally and members of the Thackeray family…. I have no connection with #SushantSinghRajput's death in any manner. This is politics over someone's death: Maharashtra Minister Aaditya Thackeray in a statement pic.twitter.com/jYv6Wj1Zfm
— ANI (@ANI) August 4, 2020
आता या सर्व प्रकरणावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, एक पत्रक काढून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू दुर्दैवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत व महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
हे तर गलिच्छ राजकारण पण मी संयम बाळगलाय!
‘कोरोना’ संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकार ‘कोरोना’चा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुधा, महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिशः माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे.
मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे’ बॉलीवूड’ हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही. सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू दुर्दैवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत व महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. याप्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे. अशाप्रकारे चिखलफेकी करून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कोणी राहू नये. तूर्त इतकेच !
आपला नम्र
आदित्य उद्धव ठाकरे
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
रस्त्यावरील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यातून मुंबईकरांची सुटका कधी?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

