Share

सध्या राज्यात सरकार अस्तित्त्वात आहे, असे वाटतच नाही; नारायण राणेंचा प्रहार

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरील आठ बाय आठच्या खोलीत बसून महाराष्ट्राचा कारभार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘सामना’ दिलेल्या मुलाखतीत ते एकाच जागी बसून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याच्या कारभार चालवण्याच्या निर्णयाचे समर्थन करतात. यामुळे ते किती अज्ञानी आहेत, हे जनतेसमोर आल्याची टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. ते मंगळवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी अनेक मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर आगपाखड केली.

यावेळी नारायण राणे यांनी म्हटले की, सध्या राज्यात सरकार अस्तित्त्वात आहे, असे वाटतच नाही. मंत्रालयात केवळ अधिकारी बसून असतात. इतर कोणी मंत्रालयात जात नसेल तर ते कायमचं बंद करुन टाका. तसेही सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर आणि पूर्ण पगार मिळत नाही. राज्यातील कोरोना मृतांचा आकडा नियंत्रणात ठेवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. एकूणच काम न करणे, हेच सरकारचे धोरण असल्याची आगपाखड यावेळी नारायण राणे यांनी केली.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली, पंतप्रधान कार्यालयात झाली नियुक्ती

याउलट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. लोकांच्या व्यथा जाणून घेत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर न पडता प्रशासन चालवायची प्रतिज्ञा केली आहे, अशी टीकाही राणे यांनी केली.

मोठी बातमी: अखेर गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी अनिल परब यांनी जाहीर केली नियमावली

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!