Share

अजित पवारांचा पुढाकार अन् एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सुटला…

Published On: 

मुंबई : उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 550 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार लवकरच होतील, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

एसटी महामंडळाने राज्य शासनाकडे दोन हजार ते अडीच हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. टाळेबंदीत एसटी महामंडळाला मोठय़ा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले असून कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही कठीण झाले आहे. एसटीला आर्थिक मदत करावी अशी मागणी महामंडळाबरोबरच विविध कामगार संघटनांनीही केली आहे. एसटीतील मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती.

कोरोना महामारीत लादलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील लालपरी ठप्प आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. मागील चार महिन्यांपासून एसटीतील कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीयेत. त्यामुळे एका वाहतूक निरीक्षकावर रस्त्यावर बसून भाजी विकण्याची वेळ आली आहे.

अरे देवा ! काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना कोणत्या मंत्र्यांच्या घरी ऐकू आल्या पक्षविरोधी घोषणा

मुळचे बार्शी इथले रहिवासी असलेले योगेश कुलकर्णी करमाळा तालुक्यात एसटी महामंडळात वाहतुक निरीक्षक म्हणून कार्य़रत आहेत. मात्र चार महिन्यांपासून पगार नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. त्यात त्यांच्या वडीलांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाल्याने त्यांना वारंवार मुळगावी बार्शीला जावे लागते. बार्शी-करमाळा प्रवासासाठी लागणारा खर्च करण्यासाठी देखील पैसे उपलब्ध नसल्याने कुटुंबाचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे मित्रांच्या साहाय्याने आपण हा व्यवसाय सुरु केल्याची माहिती योगेश कुलकर्णी यांनी दिली. राज्यशासनाने यावर काही तर मार्ग काढून लवकरात लवकर पगार करावा अशी मागणी देखील वाहतुक निरीक्षक योगेश कुलकर्णी यांनी केली.

तुकाराम मुंढे यांनी करून दिल्या घराजवळच चाचणी, समुपदेशन व अन्य सेवा उपलब्ध

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!