Share

‘पवार साहेबांना हात जोडून विनंती आहे की श्रीरामाला आता तरी शांततेत विराजमान होऊ द्या’

Published On: 

मुंबई- अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन पार पडणार असून, याची तारीखही समोर आली आहे. दरम्यान, दुसरीकडे देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. “राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा,” असा टोला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

पवारांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजपने हल्लाबोल केला आहे. राममंदिराच्या भूमी पूजनामुळे त्यांना मिरच्या लागणे स्वाभाविकच आहे असं म्हणत भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पवार यांच्यावर पलटवार केला आहे. पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून केलेल्या विधानानंतर भाजपानं आक्रमक झाली आहे. “… जर मंदिर बांधून करोना जाणार नसेल, तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी करोना नष्ट होण्याचं साकड का घातलं?,” असा सवाल भाजपाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शरद पवार यांना केला आहे.

दुसरीकडे भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी देखील पवारांना चांगलंच सुनावलं आहे.‘महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या प्रतिक्रियेत भोसले म्हणाले, नेहमीच हिंदूंच्या श्रद्धेवर, आस्थेवर घाला घालायचा. आपण स्वतः घरात गीतरामायण ऐकायचे आणि बाहेर लोकांना सांगायचे रामायण महाभारताची आता देशाला गरज नाही. हे आता तरी बंद करा. आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यानंतर, आमचे आराध्य दैवत , आमची अस्मिता असलेल्या प्रभू श्रीरामाने १४ वर्षे वनवास भोगला पण कलियुगातला वनवास जेमतेम आत्ता संपला आहे. तेव्हा पवार साहेब आपल्याला हात जोडून विनंती आहे की आमच्या प्रभु श्रीरामाला आता तरी शांततेत विराजमान होऊ द्या असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘राममंदिराच्या भूमी पूजनामुळे पवारांना मिरच्या लागणे स्वाभाविकच आहे’

सोलापूरकर कोरोनावर निश्चित मात करतील;खासदार शरद पवार यांना विश्वास

खा.पवारांच्या सोलापूर दौऱ्यावरून राष्ट्रवादीत नाराजीनाट्य,जेष्ठ नेत्याने केली खंत व्यक्त

धोका वाढला : नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ११ हजाराच्या पुढे

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!