नवी मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. राज्यातील अनेक शहर व जिल्हे पुन्हा लॉकडाऊनमध्ये जात आहेत. नवी मुंबई शहरात आज ३५२ नवे रुग्ण वाढले असून शहरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११,१३८ झाली आहे.
नवी मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असून मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत. शहरात आज १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ३४० झाली आहे. शहरात आतापर्यंत तब्बल ६,९८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहरात ३,८१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे वृत्त लोकसत्ता दिले आहे.
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरात प्रतिजन चाचणीला सुरुवात केली आहे. शहरातील लॉकडाउनबाबत अद्याप निर्णय घेतला नसून रविवारी निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मिळत आहे.
‘राज्यात तब्बल सव्वासात लाख नागरिक होम क्वारंटाईन’
राज्यातील आणखी एका जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन
२३ जुलैनंतर कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउन वाढवू नका, पुण्यातील व्यापारी आयुक्तांच्या भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
