Share

खा.पवारांच्या सोलापूर दौऱ्यावरून राष्ट्रवादीत नाराजीनाट्य,जेष्ठ नेत्याने केली खंत व्यक्त

Published On: 

सोलापूर- सोलापूरातील कोरोना परिस्थिती माहितीसाठी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्षांनी चुकीचे नियोजन केल्याने भेट घेता आली नसल्याची खंत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी महापौर मनोहर सपाटे यांनी व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रवादीचे माजी महापौर सपाटे म्हणाले की कोरोना काळात वयाच्या ८१ वर्षांच्या शरदचंद्र पवार यांचा सोलापूर दौरा पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी होता. पवार साहेबांना भेटून त्यांच्याकडून प्रेरणा घेणे, त्यांना पाहण्यासाठी पालकमंत्री व राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांना भेटण्याची संधी द्यायला हवी होती पण तसे झाले नाही.

सपाटे म्हणाले, माझ्या ४५ वर्षाच्या राजकीय प्रवासातील हा पहिलाच प्रसंग आहे. पवार साहेब सोलापुरात आले मात्र, प्रत्यक्षात भेटता आले नाही त्या बद्दल खंत व्यक्त केली. तसेच मी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना शनिवारी कमीतकमी २५ वेळा फोन केला, मात्र त्यांनी उचललाच नाही.

जिल्ह्यातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. दुसरीकडे राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत सोलापूर शहराचा मृत्यूदर सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा ज्येष्ठ नेते शरद पवार काल सोलापूर दौऱ्यावर आले. मात्र, शहरातील कोरोनाची स्थिती सांगण्याकरिता, त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याच्या निमित्ताने काही निवडक पदाधिकाऱ्यांना भेटण्याची संधी मिळायला हवी होती  असं ते म्हणाले .

महत्वाच्या बातम्या-

धोका वाढला : नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ११ हजाराच्या पुढे

भारतीय रेल्वेविरुद्ध चिनी कंपनीची कोर्टात धाव

केलेल्या पापांची फळे तर भोगावीच लागणार, या अभिनेत्याने केले सलमान खानला ट्रोल!

राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या निधनानंतर शरद पवार थेट त्या कार्यकर्त्याच्या घरी…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!