Share

‘उद्धव ठाकरेंच्या रूपाने स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ महाराष्ट्राला मिळाला’

Published On: 

मुंबई – आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अशी भाषा करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आमच्या भगवाधारी साधूंना ठेचून मारायला आता दीड वर्ष होत आलं पण त्यांच्या हत्याऱ्याला  आजपर्यंत शिक्षा होऊ शकली नाही .साधं त्यांच्याविरोधात आरोपपत्र सुद्धा व्यवस्थित दाखल होऊ शकलं नाही असं भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी म्हटल आहे.

भोसले यांनी काल मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा चांगलाच समाचार घेतला. ते पुढे बोलताना म्हणाले,  महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाला सडका म्हणणारा शर्जील उस्मानी आज मोकाट फिरतोय, त्याला कोणताही दंड केला जात नाही आणि वरून हिंदुत्वाचा आव आणता, तुमच्या ढोंगी हिंदुत्वाचा बुरखा कालच्या दसरा मेळाव्यात फाटला आहे अशी टीका देखील भोसले यांनी केला.

पुढे बोलताना भोसले म्हणाले, एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा त्या राज्याचा कुटुंबप्रमुख असतो पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कुटुंब हे केवळ ठाकरे कुटुंब आहे, महाराष्ट्र हा त्यांच्या कुटुंबाचा भाग नाही हे काल त्यांनी सिद्ध केलं. महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे की इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ उद्धव ठाकरेंच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!