औरंगाबाद : जुनी इमारत तोडण्याचे काम सुरू असताना पायरीवरून घसरून पडल्याने सुरक्षा जाळीचे तीक्ष्ण टॉप पोटात घुसल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी(७ जून) सकाळी १० वाजता तक्षशिलानगरात घडली. शेख फरहान शेख उस्मान (३०, रा. असेफिया कॉलनी ) असे मयताचे नाव आहे.
जिन्सी पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तक्षील नगरात रिजवाना बेगम यांच्या जुन्या इमारतीचे बांधकाम पाडण्यात येत आहे सदरील बांधकाम पाडण्याचे काम शेख फरहान आणि त्याच्या मित्रांना देण्यात आले होते.
इमारत पाडण्याचे काम सुरू असताना फरहान हे शिड्या चढून वर जात असताना त्यांचा तोल जाऊन ते खाली सुरक्षेसाठी लावलेल्या जाळी वरील टोकदार टॉपवर पडले ते टोकदार टॉप त्यांच्या छातीत घुसल्याने ते गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर घाटीच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते काहि वेळेतच त्यांची प्राणज्योत मालवली या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद घेण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- एक महिना तीन दिवस झाले तरी राज्य सरकाने स्वतंत्र पुनर्विचार याचिका का दाखल केली नाही?
- ‘पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाविकास आघाडीनेही राज्यातील गरिबांना भरघोस मदत करावी’
- उरवडे येथील आगीला जबाबदार कोण ? गृहमंत्री म्हणतात…
- “पीक विमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा”, परभणीत भाजप तर्फे आंदोलन
- ‘नरेंद्र मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्य सरकारने करून घेऊ नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

