पुणे : ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी २६ आणि २७ जून रोजी दोन दिवसीय लोणावळा येथे शिबीर होणार आहे. या शिबिरात राज्यातील २५० प्रतिनिधी सहभागी होतील आणि त्यामध्ये अनेक मुद्यावर चर्चा केली जाणार आहे. अशी माहिती कॉंग्रेसचे नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ते पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, या दोन दिवसीय शिबिरात ओबीसी समाजातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी सहभागी होण्याची गरज असल्याचे आवाहन मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. तसेच, त्यांनी ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, यातून समाजाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी मागणी देखील यावेळी वडेट्टीवार यांनी केली.
तर दुसरीकडे, ओबीसीचे अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द करणे, मराठा आरक्षण रद्द करणे हे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पदोन्नतीबाबतचा विषयही सर्वोच्च न्यायालयात आहे. असे असताना यासाठी राज्य सरकारला जबाबदार धरणे उचित आहे का?, असा सवाल देखील वडेट्टीवार यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्य शासनाकडून वसतिगृहाच्या कामासाठी भरीव मदत मिळवून देणार’, राज्यमंत्री बनसोडे यांची ग्वाही
- बैल, तिफण पूजन करून बच्चू कडूंनी केला पेरणीचा शुभारंभ
- गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत आपल्याला काम करायचे – उद्धव ठाकरे
- मुंबईत जमिनीला अचानक पडला खड्डा काही क्षणात कार बुडाली ;पहा व्हिडीओ
- कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ; पवार-टोपे घेणार परिस्थितीचा आढावा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

