Share

ट्रक चालकाला मारहाण करून लुटणारा एक जण गजाआड, दोघे फरार

Published On: 

औरंंगाबाद : ट्रक चालकाला मारहाण करुन लुटमार करणाऱ्या तसेच ट्रकची काच फोडून नुकसान करणाऱ्या तीन जणांपैकी करण राजन काळे (वय २४, रा.शरणापूर) याला दौलताबाद पोलिसांनी रविवारी (दि.६) पहाटे गजाआड केले असून त्याचे दोन साथीदार फरार आहेत. अटकेत असलेल्या करण काळे याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.कादरी यांनी दिले आहेत.

ट्रक चालक पंकज गंगा जैस्वाल (वय २४, रा. अरंगी जि. चंदोली उत्तरप्रदेश) हे ५ जून रोजी दुपारी जालना येथून ट्रकने क्रमांक (एमएच-१९-झेड-३०६५) लोखंडी सळ्या नाशिक येथे घेवून जात होते. साजापूर फाट्याकडून शरणापूर फाट्याकडे यत असतांना शरणापूर शिवारातील एका हॉटेल जवळ एका दुचाकीवर आलेल्या तिघांनी जैस्वाल यांचा ट्रक अडवून त्यांना मारहाण केली.

तसेच जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या जवळील गाडी भाड्याचे १७ हजार रुपये हिसकावून घेतले होते. त्यांनतर तिघांपैकी एकाने एकाने ट्रकची काच फोडून नुकसान केले. हा प्रकार पाहून तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी पोलिसांना फोन करुन माहिती दिली. तसेच मारहाण करणाNया एकाला लोकांनी पकडले होते, तर दोन पोलिस आल्याचे पाहुन पळून गेले. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!