Share

तिसरा डोस घ्यावा लागू शकतो; AIIMS च्या प्रमुखांनी वर्तवली शक्यता

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : राज्यात कोरोनाचा फैलाव कमी झाला आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याने कोरोना नियमातून विविध सूट नागरिकांना देण्यात आल्या आहेत. मुंबई लोकल प्रवासामध्ये ज्यांनी दोन डोस पूर्ण केले आहे त्यांना लोकल पास उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यातच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लशींचे दोन डोस दिले जात आहे. पण आता कोरोनापासून बचावासाठी तिसरा डोस घ्यावा लागू शकतो अशी शक्यता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली.

कोरोना लशीचा तिसरा बुस्टर डोस पुढच्या वर्षी घ्यावा लागू शकतो असे मत त्यांनी मांडले. जगातील अनेक देशांनी त्यादेशातील नागरिकांना तिसरा डोस देण्याची परवानगी दिली आहे. तसेच लहान मुलांना कोरोना लस देण्याचे डॉ.गुलेरिया यांनी योग्य असल्याचे सांगितले.अमेरिकेप्रमाणे आपल्या देशातही लहान मुलांना कोरोना लस द्यायला हवी. भारतामध्ये ५ लस वापरात असून त्यामध्ये कोविशिल्ड ही सर्वात जास्त नागरिकांनी घेतल्याचे दिसते.

काही दिवसापूर्वी सिरम इन्स्टिटूयट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा तिसरा डोस घेतल्याचे सांगितले होते. तसेच तिसरा डोस घ्यावा लागू शकतो अशी शक्यता वर्तवली होती. लशीमुळे शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीचे प्रमाण काही काळानंतर कमी होत असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. त्यामुळे तिसरा डोस संदर्भात केंद्र सरकार, आरोग्य मंत्रालय काय निर्णय घेते हे पाहवे लागेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!