🕒 1 min read
सांगली : राज्यात सध्या अमली पदार्थावरून अनेक आरोप-प्रत्यारोप राजकीय नेते आणि अधिकारी करताना दिसत आहेत. यामध्ये अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचे प्रकरण पण गाजत आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सारखे टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे चित्र दिसत आहे.
परंतु विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणावर आज भाष्य केले ते म्हणाले ‘राज्य किंवा केंद्र सरकारमधील तपास यंत्रणांनी तपास करताना अतिशय संयम बाळगला पाहिजे. उगचंच चमकोगिरी म्हणून वाटेल तशी निवेदने किंवा समाज माध्यमातून प्रसिद्धी टाळायला हवी’ असा सल्ला त्यांनी राजकीय पक्ष आणि तपास यंत्रणांना दिला. तसेच पुढे ते म्हणाले. राजकीय नेत्यांनी तपास यंत्रणेवर शंका उपस्थित केली तर कायदा व्यवस्थेला धोका आहे. नेत्यांनी या संबंधी न्यायालयात दाद मागावी. जनतेच्या मनात शंका निर्माण केली जात आहे, हे योग्य नाही आहे असेही निकम म्हणाले.
‘गुन्हा घडताच कामा नये आणि लोकांना न्यायालयात जावेच लागू नये’ या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर ते योग्य असल्याचे उज्ज्वल निकम यांनी सांगितले. पण मनुष्यस्वभावाप्रमाणे आपल्या मनासारखे झाले नाही तर याची कुठे दाद मागायची हा महत्वाचा घटक न्यायालये असायला हवीत मात्र न्यायालयात अकारण कुणाला त्रास, बदला घेण्याच्या हेतूने कायदेशीर कारवाई नसावी हाच यामागे मुखमंत्र्यांचा उदात्त हेतू आहे असे निकम म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री सावरकरवादीच, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…- संजय राऊत
- ‘कोरोनामुळे जीव गमावलेल्या ४.५३ लाख कुटुंबीयांना माफीनामा लिहून द्या’, ‘काँग्रेस’ची मागणी
- भारत-पाक सामन्यापूर्वी BCCI ने उचलले मोठे पाऊल, ‘या’ चार खेळाडूंना दिले मायदेशी परतण्याचे आदेश
- इम्तियाज जलील काहीही बोलतो, आम्ही या शहराचे ‘संभाजीनगर’ करणारच; चंद्रकांत खैरेंचा पलटवार
- …तर आम्ही या परिस्थितीत कामच करू शकत नाही- सरन्यायाधीश एन. व्ही. रमण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
