नवी दिल्ली : फूटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची सध्या सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा होत आहे. त्याने पत्रकार परिषदेत त्याच्या जवळील कोका-कोलाच्या दोन बाटल्या उचलून दूर ठेवल्या आणि पाण्याची बाटली जवळ ठेवली. ही कृती करताना रोनाल्डोने पोर्तुगीज भाषेत ‘‘एगुआ’’ म्हणजेच ‘‘पाणी प्या’’ असा संदेश दिला. रोनाल्डोचा हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर अनेकांचे प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि क्षणार्धात यावर मिम्सचा वर्षाव होऊ लागला.
Haye ni mera Coka Coka Coka Coka Coka#Euro2020 #Ronaldo #MazbootJod #FevicolKaJod pic.twitter.com/lv6YWrgfxB
— Fevicol (@StuckByFevicol) June 17, 2021
दरम्यान सोशल मीडियावर रोनाल्डोची चर्चा सुरु असताना फेव्हिकॉलने याचा फायदा घेत केलेल्या जाहिराताचीही सध्या जबरदस्त चर्चा सुरु झाली आहे. फेव्हिकॉलची ही क्रिएटिव्हीटी पाहून नेटकरी फिदा झाले आहेत. यामध्ये त्यानी पत्रकार परिषदेत टेबलावर फेव्हिकॉलचे दोन डबे ठेवल्याचं दाखवत ‘ना बाटल्या हटणार ना मूल्य हटणार’ अशी भन्नाट कॅप्शन दिली आहे. फेव्हिकॉलची ही पोस्ट काही वेळात सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आणि नेटकरी फिदा झाले. ट्विटरवर अनेकांनी ही पोस्ट शेअर करत कौतुक केलं आहे.
Time is an illusion, timing is an art – brilliant marketing by Fevicol! pic.twitter.com/aLzwAjaLWp
— Harsh Goenka (@hvgoenka) June 17, 2021
मात्र यामुळे कोको कोला कंपनीला २९ हजार कोटीचा तोटा सहन करावा लागला आहे. रोनाल्डोच्या कृतीमुळे मोठा आर्थिक फटका बसलेल्या कोका कोलाने या घटनेवर प्रतिक्रिया देताना ‘काय प्यावे यासाठी प्रत्येकाचं आपली आवड आहे. प्रत्येकाची चव आणि गरज वेगळी आहे,’ असं म्हटलं आहे. कोका कोला युरो कपच्या स्पॉन्सर्सपैकी एक आहे.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांच्या बैठकीदरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या कंत्राटी परिचारिकांवर लाठीचार्ज
- अखेर ठरलंच ! विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीच्या नेत्याने केलं महत्वाचं विधान
- …तर काँग्रेस पक्ष आडवा येईल ; भाई जगताप यांची आक्रमक भूमिका
- ‘माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर ‘हा’ कसा असेल’; खडसेंचा सवाल
- कुठे आणि कधी पाहता येणार WTC चा अंतिम सामना ?, वाचा सविस्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

