Share

मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीचा मुद्दा हायकोर्टात; उद्या होणार सुनावणी

Published On: 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेचा भंग झाल्याची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वाच्च न्यायालय शुक्रवारी घेणार आहे. याबाबत वरिष्ठ अधिवक्ता मनिंदर सिंग यांनी ही बाब नमूद केली होती. यावरच उद्या सुनावणी होणार असल्याचे कळते आहे.

मनिंदर सिंग यांनी भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमण (Chief Justice N.V. Raman) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगितले की, जे घडले त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. ही याचिका सर्वाच्च न्यायालयाने स्वीकारावी अशी विनंतीही त्यांनी केली आहे. तसेच ही एक गंभीर चूक आणि अस्वीकार्य सुरक्षेचा भंग आहे. आणि राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता न्यायालयाकडून पोलिस बंदोबस्ताची चौकशी करणे आवश्यक आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी हे आवश्यक असल्याचे मनिंदर सिंग (Maninder Singh) यांनी म्हटले आहे.

नेमकी घटना काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांची काल पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर आंदोलकांमुळे सुमारे १५ ते २० मिनिटे अडकून पडला. जिथे हा ताफा अडकला तिथून पाकिस्तान फक्त १० किमी अंतरावर होतं त्यामुळे हा घटनाकर्म मोदींच्या हत्येचा कट होता. असा आरोपही भाजपने केला आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Punjab CM Charanjit Singh Channi)यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधानाच्या गैरसोईबद्दल माफी मागितली आहे.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातील सुरक्षेमध्ये काही त्रुटी आढळल्या असतील तर त्याची आम्ही चौकशी करू. पंतप्रधानांना या दौऱ्यामध्ये कोणताही धोका नव्हता. आज फिरोजपूर जिल्ह्यात दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींना (PM Modi) परतावं लागलं याबद्दल मी खेद व्यक्त करतो. आम्ही आपल्या पंतप्रधानांचा आदर करतो. असे चरणजीत सिंग चन्नी यांनी म्हटले आहे. दरम्यान ‘सुरक्षा त्रुटी’संदर्भात सविस्तर अहवाल सादर करून सुरक्षेतील त्रुटीला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब सरकारला दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!