Share

५५ हजार एसटी कर्मचाऱ्यांना नोटीस देणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?- अतुल भातखळकर

Published On: 

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वीपासून एसटीचे विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी संप पुकारला आहे. (Maharashtra ST bus strike) तो अद्यापही सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांना वेतनात ४१ टक्के वाढ दिली, विलीनीकरणासाठी समितीही नेमण्यात आली. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी लाखो प्रवाशांना वेठीस धरून संप सुरूच ठेवला आहे. राज्य सरकारने संप मिटल्याची घोषणा केली असली तरी अद्याप काही कर्मचारी कामावर परतलेले नाहीत. त्यामुळे आता एसटी महामंडळाने कामावर न येणाऱ्या ५५ हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवली आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’५५ हजार एसटी कर्मचाऱ्यांना नोटीस देणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? मुख्यमंत्री तोंडाने बोलताना एसटी कर्मचारी आमचेच आहेत म्हणतात प्रत्यक्षात कारवाई करताना मात्र सूडबुद्धी वापरतात. बुद्धी भ्रष्ट झालेल्या झालेल्या सरकारचा तीव्र निषेध’, असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान, या नोटीसमध्ये सेवा समाप्ती करण्यात आलेले कर्मचारी वगळून जे कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत त्यांना शिस्त आणि आवेदन कार्यपध्दतीनुसार अपराध कारवाई का करण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा असे म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!