Share

कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानंतर शरद पवार मैदानात, आज महत्वाची बैठक

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. राज्यात मुंबई, पुणे हॉटस्पॉट ठरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे प्रशासनाने, नागरिकांना काळजी करण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, राज्यातील रुग्णसंख्या वाढल्यानंतर आता शरद पवार मैदानात आले आहेत. आज बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य आरोग्य सचिव प्रदीप व्यास शरद पवार यांना कोरोना स्थितीची माहिती देणार आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देखील या बैठकीत हजर राहणार आहेत.

महाराष्ट्रात कोरोना झपाट्याने वाढत आहे. दररोज कोरोनाची नवीन प्रकरणे वाढत आहेत. महाराष्ट्र रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश साळुंखे म्हणाले की, गेल्या तीन दिवसांत जेजे हॉस्पिटलसह महाराष्ट्रातील एकूण ३०५ डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातच आढळून येत आहेत.

गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे २६,५३८ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर या काळात आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ५,३३१ लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या ८७,५०५ झाली आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे एकूण ७९७ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तसेच ओमायक्रॉनमधून ३३० लोक बरे झाले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!