🕒 1 min read
जालना : बसमध्ये प्रवाशांचं लक्ष विचलित करून साहित्य, पाकीट आणि दागिने चोरणाऱ्या पाच महिलांची टोळी पोलीसांनी जेरबंद केली आहे. लांब पल्ल्याच्या बसमध्ये बसून प्रवाशांना विचलित करून किंवा बसमध्ये चढत असतानाच या महिला चोऱ्या करायच्या, असे तपासातून समोर आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या महिला या मंठा तालुक्यातील असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या टोळीतील महिला जास्त प्रवासी असलेली लांब पल्ल्याच्या बसमध्ये बसत होत्या. बसमध्ये बसतानाच कुणाचे तरी पाकीट मारायचे, दागिने चोरायचे, आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या प्रवाशांच लक्ष विचलित करायचे आणि दागिने-पैसे चोरार होत्या. अखेल पोलिसांनी सदर बाजार पोलिस आणि चार्ली पथकाने या टोळीला जेरबंद केले आहे.
लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये बसायचे अन् प्रवाशांचा मुद्देमाल चोरून जवळ उतरून फरार व्हायचे, असे अनेक प्रकार समोर आले होते. या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रारी देखील दाखल झाल्या होत्या. त्यानुसार पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, एएसपी विक्रांत देशमुख, डीवायएसपी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या पथकाने या टोळीमधील महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
- धोक्याची घंटा; मराठवाड्यात २ हजार ४६७, विदर्भात ४ हजार ९९३ नव्या बाधित रुग्णांची नोंद
- औरंगाबादेत १०२३ कोरोनाबाधित रुग्णांची नोद, आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या
- कोरोनामुळे चार महिन्यांनंतर पुन्हा तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद
- जालन्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? आज होणार निर्णय
- लहान मुलांनी भीक मागणे हा कायद्याने गुन्हा; औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
