🕒 1 min read
मुंबई: मुंबईतील ताडदेव भागात अत्यंत धक्कादायक घटना घडली असून येथील एका इमारतीत अग्नी तांडव बघायला मिळाला आहे. ताडदेव भागातील एका २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आज(२२ जाने.)सकाळी भीषण आग लागली असून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तसेच या घटनेत १५ जण जखमी झाले आहेत, तर ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी संताप व्यक्त केला आहे.
“आपलं मुंबई शहर समोर उद्ध्वस्त होत आहे. (आगीचा व्हिडिओ पोस्ट केला असून )सरकारी इस्पितळात सुरक्षिततेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे आम्ही हॉस्पिटलमध्येच मरतोय, खड्डे आणि अनागोंदीने भरलेल्या रस्त्यांवर रस्ते अपघातात आपण मरतोय, याला कोण जबाबदार आहे?” असा सवाल करणारे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले आहे.
Our city Mumbai,being destroyed in front of us-
We die in our homes bcoz of improper high rise infra,
We die in hospitals bcoz of unattended safety norms in government hospitals,
We die in road accidents on roads which are full of pits & chaos,
Who is responsible ?#MumbaiFire pic.twitter.com/L92NL9LNLQ— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 22, 2022
दरम्यान, ही आग नाना चौकातील गांधी रूग्णालयाच्या समोरील कमला बिल्डिंगला लागली असून या घटनेत १५ जण जखमी झाले आहेत, तर ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे . तसेच अन्य दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहेत, तर बाकी जणांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु असल्याचे बघायला मिळत असून ही आग कशी लागली यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या:
- ‘असा’ दिसतोय कोई मिल गया तील ‘बिट्टू सरदार’; हृतिकलाही टाकले मागे
- मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत- चंद्रकांत पाटील
- औरंगाबाद जिल्ह्याला मिळाले ३८५ कोटी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा..!
- “पुण्यातील शाळा-महाविद्यालये बंदच, मात्र…”, अजित पवारांचे स्पष्टीकरण
- महिला आणि युवकांनी निश्चय केल्यास गाव कोविडमुक्त होऊ शकेल-उपमुख्यमंत्री अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
