Share

औरंगाबाद जिल्ह्याला मिळाले ३८५ कोटी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा वार्ष‍िक सर्वसाधारण योजनेत ३१५ कोटीच्या मर्यादेत पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या मान्यतेने जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने ५०० कोटी रूपयांचा १८४ कोटी रूपयांच्या वाढीव मागणीसह प्रारूप आराखडा सादर केला. परंतु कोविड, महसुलात घट आदींमुळे जिल्ह्याला ७० कोटी रूपये अधिक देत ३८५ कोटी रूपयांच्या प्रारूप आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी आज मंजुरी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्ष‍िक योजना (सर्वसाधारण) २०२२-२३ प्रारूप आढावा बैठक व्हीसीद्वारे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तिथे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांचीही उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रोहयो मंत्री संदीपान भूमरे, जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, प्रशांत बंब, उदयसिंग राजपूत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता आदींसह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले, मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद आहे. या ठिकाणी मराठवाड्यासह मराठवाड्याला लागून असलेल्या इतर विभागांच्या जिल्ह्यांचे रूग्णही घाटीत उपचारासाठी दाखल होतात. कोरोना सारख्या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याशिवाय इतर विकासकामे करणे निधीअभावी करणे शक्य होत नाही. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बंधारे वाहून गेले आहेत. त्यांची दुरूस्ती करणे आहे.

तसेच रस्त्यांचेही नुकसान झालेले आहे. पर्यटन सुविधा, अत्याधुनिक पोलिस वाहने, शाळा दुरूस्ती आदी बाबींच्या विकासासाठी निधी आवश्यक असल्याचेही त्यांनी वाढीव १८४.१६ कोटी निधी मंजूर करावा असे वित्तमंत्री पवार यांना सांगितले. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्हा वार्ष‍िक योजना (सर्वसाधारण) २०२२-२३ चा प्रारूप १८४.१६ कोटीच्या अतिरिक्त मागणीसह ५०० कोटींचा जिल्हा नियोजन समितीने प्रस्तावित केलेला आराखडा सादर केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!