🕒 1 min read
मुंबई : बॉलीवुडमधील सुपरहिट चित्रपटापैकी ‘कोई मिल गया’ (Koi Mil Gaya) हा एक लोकप्रिय चित्रपट आहे. या चित्रपटातील एक क्यूट चिमुकला मुलगा आठवतो ना. जो अभिनेता ऋतिक रोशनसोबत (Hrithik Roshan) सरदार मित्र ‘बिट्टू’ (Bittu Sardar) ही भूमिका साकारली असून सर्वांना आवडली देखील. आता तोच ‘बिट्टू सरदार’ कसा दिसतोय याबद्दल आपल्याला माहिती आहे का. चला जाणून घेऊ या.

‘बिट्टू सरदार’ म्हणजेच अभिनेता अनुज पंडित शर्मा (Anuj Pandit Sharma) आता मोठा झाला आहे. त्याने आपला एक लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर (social media) शेअर केला आहे. या फोटोत ब्लू कलरचा शर्ट आणि ब्लॅक कलरची जीन्स परिधान केलेला दिसत आहे. तसेच दोन्ही हात पॉकेटमध्ये टाकून हटके लुकमुळे आकर्षक दिसत आहे. या फोटोवर त्याने लिहिले आहे की, ‘तेरे मरने पर बहुत रोंगे, तेरे रोने पर कौन मरता है?’ तसेच स्माइल इमोजी देखील पोस्ट केली आहे. त्याचा चाहत्यांना त्याचा हा अंदाज खूप आवडला आहे. या फोटोवर लाईक आणि कमेंट्स करत आहेत.
अनुज आता २५ वर्षांचा तरूण झाला असून सर्वांचे लक्ष वेधत आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याला ऋतिकपेक्षा ही अधिक स्मार्ट असल्याचं म्हटलं आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोमधील कमेंट बॉक्समध्ये ‘हा तोच ‘बिट्टू’ आहे?, सो क्यूट, हॅण्डसम मॅन अशा कमेंट आल्या आहेत. तो अलिकडे ‘टोटल सियापा’ या चित्रपटात झळकला. या शिवाय तो टेलिव्हिजन वरील ‘परवरिश’ या मालिकेच्या दुसऱ्या सिझन मध्ये देखील भूमिका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
-
“डिपॉझिट गेलं तरी आम्ही लढत राहू”, भाजपच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर
-
अभिनेत्री अथिया आणि केएल राहुल यावर्षी बांधणार रेशमगाठ?, सुनील शेट्टीच्या ट्वीटमुळे चर्चेला उधाण
-
…त्यामुळे प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश झाला नाही- प्रियंका गांधी
-
“कितीही नकली गावगुंड समोर आणले तरी जनता नानाला वाजवणारच”, अनिल बोंडेंचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
