Share

इकडं शेतकरी आत्महत्या करतोय अन सरकार विजयाचा जल्लोष करतयं – कॉंग्रेस

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : शेतकरी आत्महत्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. सरकारला शेतकरी आत्महत्येचं काही देणेघेणे नसून ते विजयाच्या जल्लोषात दंग आहे.भाजप सरकार, शेतकऱ्यांच्याच जीवावर उठले आहे. अशी टीका महाराष्ट्र कॉंग्रेसने त्यांचा ट्विटर अकाऊंट वरून केली आहे. भाजप सरकारने लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला, त्यांनतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा ३० तारखेला शपथविधी झाला. शपथविधी झाल्यानंतर दोन दिवसांमध्ये विरोधकांनी टीका करणे सुरु केले आहे.

भाजप सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकरी आत्महत्या वाढतचं असून राज्यात दररोज सरासरी ५ शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारला मात्र याच्याशी काही देणेघेणे नसून ते विजयाच्या जल्लोषात दंग झाले आहेत. अशी टीका महाराष्ट्र कॉंग्रेसने त्यांचा ट्विटर अकाऊंट वरून केली आहे. इतकेच नव्हे तर, शेतकऱ्यांना आश्वासनं देऊन निवडून आलेलं भाजप सरकार, शेतकऱ्यांच्याचं जीवावर उठले आहे. अशी टीकाही त्यामध्ये करण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!